Home ठळक बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

कल्याण | २२ जुलै :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे आज राज्यभरात प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष नगरसेवक शामल गायकर, सरचिटणीस दर्शन बाबरे यांच्या माध्यमातूनही प्रभागात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (BJP Yuva Morcha Organizes Blood Donation Camp to Mark Chief Minister Devendra Fadnavis’ Birthday)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजपतर्फे भव्य रक्तदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना १ लाख रक्तदात्यांचे उद्दिष्ट दिले असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात त्यादृष्टीने कार्यवाही केली जात आहे. कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक ७ मध्येही युवा मोर्चा उपाध्यक्ष नगरसेवक शामल गायकर आणि सरचिटणीस दर्शन बाबरे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला युवक आणि युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १०० ते १२५ पिशव्या रक्त जमा होणार असल्याचा विश्वास यावेळी युवा मोर्चा उपाध्यक्ष नगरसेवक शामल गायकर यांनी व्यक्त केला.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजप नगरसेवक युवासेना उपाध्यक्ष शामल गायकर, दर्शन बाबरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष शैलेश देशपांडे, उपाध्यक्ष ॲड. विकास भुंडेरे, युवा मोर्चा सचिव साहिल रोकडे, तेजस केंबारे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा