
डोंबिवली दि.2 जानेवारी :
डोंबिवलीतून भाजपचा सुरू झालेला बिनविरोध विजयी घोडदौड सुरूच असून त्यामध्ये आता आणखी 4 उमेदवारांची भर पडली आहे. डोंबिवली पॅनल क्रमांक 23 मधील भाजपाचे उमेदवार दिपेश म्हात्रे, त्यांचे बंधू जयेश म्हात्रे यांच्यासह हर्षदा हृदयनाथ भोईर हे तिघे जण बिनविरोध विजयी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याचसोबत पॅनल 30 मधील भाजप उमेदवार रविना अमर माळी या भाजप महिला उमेदवारही बिनविरोध निवडून आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजपच्या विजयी उमेदवारांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे.

























