
कल्याण दि.15 एप्रिल :
शिवसेना पक्षाकडून कल्याण ग्रामीण भागातील संघटनात्मक बळकटीसाठी गजानन पाटील यांची कल्याण ग्रामीण (डोंबिवली) तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी नियुक्तीपत्राद्वारे स्पष्ट केले आहे. (Gajanan Patil Appointed as Shiv Sena Kalyan Rural (Dombivli) Taluka Chief)
तसेच गजानन पाटील यांच्यावर आगामी एक वर्षासाठी ही तालुका प्रमुखपदाची महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली असून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे निर्देशही या नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहेत.
नियुक्तीसोबत देण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचना…
* संघटनात्मक कार्य करताना संघटनेच्या हिताची जपणूक करणे,
* पक्षाच्या सर्व कार्यक्रमाना उपस्थित राहणे,
* संघटनेला आणि संघटनेच्या प्रतिष्ठेला आपल्यामुळे डाग लागणार नाही याची खबरदारी घेणे,
* मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधणे आणि संघटनेचे काम मतदारांपर्यंत पोहोचवणे,
* जिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, विभाग संघटक, उपविभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे
* संघटनात्मक कोणताही कार्यक्रम किंवा उपक्रम करतेवेळी जिल्हाप्रमुख आणि वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक
अशा विविध मुद्द्यांचा त्यात समावेश आहे.
पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही – गजानन पाटील
तर शिवसेनेच्या कल्याण ग्रामीणतालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यासाठी शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे तसेच संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे , जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे तसेच आमदार राजेश मोरे साहेब यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आपण नेहमी विभागातील जनतेच्या हितासाठी संपूर्ण क्षमतेने काम करून नेहमी पक्ष वाढ़ीसाठी काम करू असा विश्वास या नियुक्तीनंतर गजानन पाटील यांनी व्यक्त केला आहे.


























