
कल्याण दि.13 एप्रिल :
कल्याण -मुरबाड – नगर महामार्गावर रायते गावाजवळ एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका सिमेंट मिक्सर ट्रक आणि प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या इको (काळी पिवळी) मध्ये हा जबरदस्त अपघात झाला आहे. या अपघाताचे अतिशय भयावह असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही धडक इतकी भयानक आहे की यामध्ये इको गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. (Horrific Accident at Rayate on Kalyan-Murbad Highway; Cement Mixer Collides with Black-and-Yellow Vehicle)
हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती समजू शकलेली नसून तो इतका भीषण आहे की इको गाडीतील काही प्रवाशांनी जागेवर जीव गमावला असल्याची भिती वर्तवण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त थोड्या वेळात…


























