
पुढील महिनाभर प्रायोगिक तत्त्वावर लागू राहणार अधिसूचना
डोंबिवली दि.2 मे:
डोंबिवलीच्या विष्णू नगर पोलिस ठाणे येथील पं. दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील वाहन पार्किंगसाठी वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्तांनी नवी अधिसूचना जारी केली आहे. या मार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन अधिसूचनेनुसार या मार्गावर कोणत्या दिशेला पार्किंग आणि कोणत्या बाजूला नो पार्किंग याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
हा रस्ता मुळातच अरुंद असल्यासोबतच याठिकाणी अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात आणि त्याचा वाहतुकीला मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक डी सी पी पंकज शिरसाट यांनी पुढील महिनाभराच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही अधिसूचना जारी केली आहे.