Home ठळक बातम्या महत्त्वाची माहिती ; कल्याण डोंबिवलीमध्ये “यादिवशी” 12 तास पाणी पुरवठा बंद

महत्त्वाची माहिती ; कल्याण डोंबिवलीमध्ये “यादिवशी” 12 तास पाणी पुरवठा बंद

कल्याण डोंबिवली दि.24 एप्रिल :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत तसेच यांत्रिक उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. (Important Update: No Water Supply in Kalyan-Dombivli for 12 Hours on This Day )

या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा १२ तास बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या कामामुळे कल्याण पूर्व आणि पश्चिम तसेच कल्याण ग्रामीण भागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि इतर गावांसह डोंबिवलीतील पूर्व आणि पश्चिम परिसराचा पाणीपुरवठा 12 तास पूर्णपणे बंद राहणार आहे.

महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, या कालावधीत आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा व पाण्याचा जपून वापर करावा. तसेच दुरुस्तीच्या कामात सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी या संदर्भात अधिकृत प्रेस नोटद्वारे माहिती दिली आहे. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पाणी भरून ठेवण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा