
कल्याण | १६ जून :
कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेचा लाभ घेणाऱ्या मात्र विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शिस्त लागण्यासह महसूल वाढीसाठी केडीएमटी परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे यांच्या आदेशानुसार विशेष भरारी पथक कार्यरत करण्यात आले आहे. (KDMT Flying Squad Takes Action Against Ticketless Passengers; More Than ₹14,000 Recovered in Fines)
या पथकाची जबाबदारी कर्तव्यनिष्ठ केडीएमटी अधिकारी संतोष हेरोडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगार व्यवस्थापक दीपक चौधरी यांच्या नियोजन आणि वाहतूक निरीक्षक प्रमोद बागुल यांच्या सूचनेनुसार भरारी पथक प्रमुख संतोष हेरोडे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक सदस्य प्रवीण देशमुख, बाळासाहेब एरंडे तसेच राजेंद्र पातकर हे कार्यरत आहेत.
या पथकाने 20 मे 2026 ते 15 जून 2026 या 25 दिवसांच्या कालावधीत पहाटे 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत तपासणी मोहीम राबवून विनातिकीट फुकट्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकूण 14 हजार 734 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकीट प्रवाशांसोबतच चालक वाहक यांच्याकडील वैयक्तिक रक्कम आणि लायसन तपासणी मोहीमही राबवली जात आहे
या मोहिमांबाबत भरारीपथक प्रमुख संतोष हेरोडे म्हणाले की परिवहन व्यवस्थापक यांच्या आदेशानुसार आम्ही प्रवाशांना शिस्त लागावी आणि परिवहनचा महसूल वाढवण्याच्या उद्देशाने आम्ही सर्व जण प्रामाणिकपणे काम करत आहोत.


























