कल्याण | १२ मे :
कल्याणातील रोट्रॅक्ट क्लब ऑफ बिर्ला कॉलेजतर्फे आयोजित “The Belonging Blueprint” या सामाजिक आणि समावेशकतेचा संदेश देणाऱ्या उपक्रमाचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले. ‘सफारा – द मोमेंट्स’ या प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम दोन टप्प्यांमध्ये राबवण्यात आला. समाजामध्ये सर्वसमावेशकता, संवाद आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. (Rotaract Club of Birla College Successfully Organises “The Belonging Blueprint” Initiative Promoting Inclusivity and Social Awareness)
उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात *Campora* अंतर्गत Shine Angel English School येथे तीन दिवसांचे शैक्षणिक उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक खेळ, डान्स स्पर्धा आणि संवादात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणे, टीमवर्कची भावना रुजविणे आणि खेळातून शिक्षण देणे यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आयोजकांची मेहनत यामुळे हा कॅम्प अत्यंत यशस्वी ठरला.
तर दुसऱ्या टप्प्यात Zenvaar – Beyond Silence हा उपक्रम रोटरीच्या डोंबिवलीतील Deaf School येथे पार पडला. हा उपक्रम Thaagm Foundation आणि Rotary Club of Dombivli Winners यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थ्यांना स्टेशनरीसह गरजू मुलांना श्रवणयंत्रांचेही वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सांकेतिक भाषेच्या प्राथमिक प्रशिक्षणाने करण्यात आली. यामुळे स्वयंसेवकांना विद्यार्थ्यांशी अधिक जवळीक साधता आली आणि संवाद अधिक प्रभावी झाला. यानंतर ‘पास द बॉल’, पेपर फ्लॉवर मेकिंग यांसारख्या सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले विचार आणि भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली.
या दोन्ही टप्प्यांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर ‘प्रोजेक्ट सफारा’ची सांगता करण्यात आली. समाजात समावेशकतेची भावना दृढ करण्यासाठी आणि विविध वयोगटांमध्ये सकारात्मक संवाद निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगण्यात आले.
#TheBelongingBlueprint #RotaractClub #BirlaCollege #Inclusivity #SocialAwareness #CommunityEngagement #YouthForChange #Dombivli #RotaryClub #Safaraa #BeyondSilence #Empathy #SocialInitiative #StudentLeadership

