Home ठळक बातम्या आयएमए कल्याणच्या ‘रेडवेव्ह’ रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; थॅलेसेमियाग्रस्तांसाठी सरसावले शेकडो रक्तदाते

आयएमए कल्याणच्या ‘रेडवेव्ह’ रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; थॅलेसेमियाग्रस्तांसाठी सरसावले शेकडो रक्तदाते

कल्याणातील महिला वर्ग, शासकीय अधिकारी, डॉक्टर, उद्योजक, वकील, क्रीडापटूंसह सामान्य नागरिकांचे रक्तदान

कल्याण | २८ जून :
समाजातील गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी आणि थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या रक्ताची गरज भागविण्याच्या उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) कल्याण शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘रेड वेव्ह’ रक्तदान महाअभियानाला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला वर्ग, शासकीय अधिकारी, डॉक्टर, उद्योजक, वकील, क्रीडापटू तसेच विविध क्षेत्रातील शेकडो नागरिकांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. (IMA Kalyan’s ‘Red Wave’ Blood Donation Drive Receives Overwhelming Response; Hundreds Donate Blood for Thalassemia Patients)

कल्याण पश्चिमेतील मोहन अल्टेझाच्या बॅन्क्वेट हॉल (पी-३) येथे पार पडलेल्या या शिबिरात मोठ्या प्रमाणावर रक्त संकलित करण्यात आले. संकलित होणारे रक्त थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याने या उपक्रमाला विशेष सामाजिक महत्त्व प्राप्त झाले होते.

size-full wp-image-33258″ />

“Donate Blood, Save Lives”आणि “Together Let’s Create A Red Wave of Hope”या संदेशावर आधारित आयोजित करण्यात आलेल्या या महाअभियानातून रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासोबतच समाजात रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, अनेक कुटुंबांना नवजीवन मिळू शकते, हा संदेशही या माध्यमातून देण्यात आला.

शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते, नव्या रक्तपेशींची निर्मिती होते आणि एखाद्याचा जीव वाचविल्याचे समाधान मिळते, अशी माहितीही उपस्थितांना देण्यात आली.


“डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करत असतो. यंदाच्या वर्षी आयोजित रक्तदान शिबिरात जमा झालेले रक्त थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी अनेक नामांकित व्यक्ती, संस्था आणि सामान्य रक्तदात्यांनी घेतलेल्या पुढाकारातून चांगला सामाजिक संदेश दिल्याची प्रतिक्रिया इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ राजेश राघव राजू यांनी दिली. तसेच हा उपक्रम आयएमए कल्याणचे सचिव डॉ. हिमांशू ठक्कर आणि खजिनदार डॉ. स्वाती शेलार यांच्यासह आयएमए कल्याणच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडल्याचेही त्यांनी सांगितले.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा