
कल्याण डोंबिवली दि.4फेब्रुवारी :
काही प्रवास हे नकाशावर आखलेले नसतात..ते घडत जातात, कामातून, जबाबदारीतून आणि येणाऱ्या अनुभवांतून. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रवासही काहीसा असाच आहे, शांतपणे सुरू झालेला, पण आज गरुडझेप घेत आकाशाएवढा विस्तारताना दिसतोय. एका नवख्या युवा खासदारापासून सुरू झालेला हा प्रवास आज गेमचेंजर डेव्हलपमेंटपासून ते यशस्वी आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीपर्यंत पोहोचला आहे. (Relentless Shrikant: From Game-Changer Development to International Diplomacy)

राजकारणातील अनपेक्षित प्रवेश आणि घोडदौड सुरू…
लोकसभा निवडणूक मे 2014… डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे…
राजकारणात येण्याची कोणतीही सुप्त इच्छा किंवा महत्त्वाकांक्षा नसताना अवघ्या 27 वर्षांचा हा तरुण अपघाताने थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतो आणि बहुमताने निवडूनही येतो. डॉक्टरकीची स्वप्नं पाहणाऱ्या या तरुणाने नंतर मग राजकारणाची आणि इथल्या लोकांची नस अशी काही पकडली की पूर्वी वडिलांच्या नावाने असणारी त्यांची ओळख ही कधीच मागे पडली. आणि लोकसभा मतदारसंघातील अभूतपूर्व आणि यापूर्वी कधीही न झालेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी कल्याण डोंबिवली, ठाणे मुंबईसह देशभरात नावलौकिक मिळवला. एक युवा खासदार ते मुरब्बी राजकारणीच्या दिशेने सुरू असलेल्या त्यांच्या या गतिमान प्रवासाचे राजकीय वर्तुळात जितके अप्रूप आहे तितकेच कौतुकही केले जात आहे. LNN

गेमचेंजर डेव्हलपमेंटद्वारे शहरांच्या प्रवासाला दिशा…
2014 च्या लोकसभा निवडणुकांनंतर आजपर्यंतचा कार्यकाळ बघितला तर ज्याप्रमाणे संपूर्ण देशाचा चेहरा मोहरा बदलून गेलाय. अगदी त्याचप्रमाणे या गेल्या 12 वर्षांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघानेही कात टाकली आहे, ही बाब कोणीही अमान्य करणार नाही. गेल्या काही वर्षांत कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरात आजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची विकासकामे कधीही झाली नव्हती. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये विविध क्षेत्रामध्ये अनेक लहान मोठी विकासकामं झालेली दिसून येतील.
मग ते कल्याण तळोजा मेट्रोचे काम असो,
मतदारसंघातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते असो,
रेल्वेचे प्रश्न असो, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असो
आरोग्याचा प्रश्न असो, डोंबिवलीतील पासपोर्ट सेवा केंद्र असो
की काही महिन्यांपूर्वी भूमिपूजन झालेले देशातील पहिले अत्याधुनिक व्हर्टिकल स्टेडियम असो.
त्यांनी केलेल्या या विकासकामांची यादी इतकी मोठी आहे की ती पाहता त्यांच्या कार्याचा प्रचंड आवाका आणि त्यांचे व्हिजन या दोन्ही गोष्टी दिसून येतात. दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांनीही अनेक जाहीर कार्यक्रमांतून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामांचे कौतुक करतानाच कामाच्या बाबतीमध्ये श्रीकांत आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असल्याची कौतुकाची थाप बऱ्याचदा दिली आहे. LNN

संसदेतील सातत्यपूर्ण,अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद मांडणीचा गौरव…
बरं हे झाले मतदारसंघातील विकासकामांबाबत. मात्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे केवळ तेवढ्यावरच थांबले नाहीत. लोकसभेच्या आतापर्यंत झालेल्या विविध अधिवेशनांमध्ये त्यांनी मतदारसंघातील पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि नागरी समस्यांबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित तर केलेच आहेत. त्याचसोबत देशातील सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक मुद्द्यांवरही त्यांनी तितकेच अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत. लोकसभेतील त्यांच्या या सातत्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूदपणाची दखल घेऊन लोकसभा खासदारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ‘संसद रत्न’ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. यावरूनच लोकसभा अधिवेशन काळातील त्यांच्या दर्जात्मक कार्यक्षमतेची ओळख आपल्याला पटू शकते. डॉ. श्रीकांत शिंदे यांची ओळख केवळ मतदारसंघापुरती मर्यादित राहिली नाही. LNN

आंतरराष्ट्रीय पटलावरील त्या कामाचे पंतप्रधानांकडून कौतुक…
हे ही कमी म्हणून की काय त्यांच्या याच अभ्यासपूर्ण कार्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ऑपरेशन सिंदूरनंतर विदेशामध्ये भारताची भूमिका मांडण्यासाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची धुरा त्यांच्यावर सोपवली. मग खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही अतिशय जोरकसपणे आणि तितक्याच परिणामकारक पद्धतीने जगभरातील विविध देशांमध्ये भारताची भूमिका मांडली. ज्यामुळे हे सर्व देश एकसंधपणे भारताच्या बाजूने उभे राहिले. या पूर्णपणे नव्या तसेच आव्हानात्मक जबाबदारीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीने न्याय दिला, त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच स्तरांतून कौतुक झाले. LNN

राजकीय समज : पडद्याआडची महत्त्वपूर्ण भूमिका…
इतकेच नाही तर महाराष्ट्रातील पक्षफुटीच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड असलेल्या शिवसेनेतील बंडानंतरच्या घडामोडींचा उल्लेख केल्याशिवाय त्यांचे राजकीय वर्तुळ पूर्ण होणार नाही. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आणि उभ्या महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते असे एकनाथ शिंदे यांच्या कामाचे झपाटलेपण पाहिले. अक्षरशः काळ नाही – वेळ नाही, दिवस नाही की रात्र नाही, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी अवघ्या दोन अडीच वर्षांच्या कालावधीत पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे उभा महाराष्ट्र पिंजून काढला. या दोन अडीच वर्षांच्या काळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही मग त्या काळात स्थितप्रज्ञ राहून अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जिचे राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांसह राजकीय धुरिणांनी मोठे कौतुक केले. LNN

महापालिका निवडणुकीतील मास्टर स्ट्रोकची राज्यभर चर्चा…
तर नुकत्याच झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खेळलेल्या मास्टरस्ट्रोकची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा होत आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांचा गट स्थापन करताना त्यांनी विरोधात निवडणुक लढविलेल्या मनसे आणि माजी आमदार राजू पाटील यांना आपल्या बाजूने वळवले. शिवसेना भाजप महायुतीसाठी मनसेचा पाठिंबा मिळवत त्यांनी सर्वानाच मोठा धक्का दिला. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी या राजकीय रणनीतीतून एकाच वेळी विरोधक आणि आपल्या मित्रपक्षाना स्पष्ट संदेश दिल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. LNN

राजकीय प्रवास महत्त्वपूर्ण टप्प्यावर…
युवा खासदारापासून सुरू झालेला हा राजकीय प्रवास आज एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. मतदारसंघातील गेमचेंजर विकासकामे, संसदीय गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय डिप्लोमसी आणि राजकीय रणनीती या सगळ्यांचा संगम म्हणजे डॉ. श्रीकांत शिंदे असेच समीकरण बनले आहे.
म्हणूनच त्यांच्या प्रवासाकडे पाहताना हे स्पष्ट होतं
ही गरुडझेप थांबलेली नाही…
ती अजून उंच जाणार आहे.
यात कोणतेही दुमत नसेल…
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसानिमित्त पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…
©️ LNN : Local News Network

























