Home ठळक बातम्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील दमदार कामगिरी; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नागरी सत्काराचा...

कल्याण लोकसभा मतदारसंघातील दमदार कामगिरी; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नागरी सत्काराचा ठराव महासभेत मंजूर

कल्याण डोंबिवली दि.16 मार्च :
कल्याण लोकसभा मतदारसंघात महत्वाकांक्षी विकासकामांच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी आणणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा लवकरच नागरी सत्कार केला जाणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आज झालेल्या पहिल्यावहिल्या महासभेत महायुतीच्या नगरसेवकांनी तसा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केला आहे. (Resolution Passed in the General Body to Felicitate MP Dr. Shrikant Shinde for His Remarkable Performance in the Kalyan Lok Sabha Constituency)

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या दशकभराच्या कारकिर्दीत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात विकासकामांचा अक्षरशः रतीब घातला आहे. गेल्या दशकभरात कल्याण लोकसभेमध्ये मेट्रो, सिमेंटचे रस्ते, रिंग रोड, उड्डाणपूल यांच्यासह अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि नागरी सुविधांसाठी हजारो कोटींच्या निधीची विकासकामे सुरू झाली आहेत.

त्याची दखल घेऊन शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे आणि उपमहापौर राहुल दामले यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव महासेभत मांडला होता. त्या प्रस्तावाला शिवसेनेसोबतच भाजपच्या नगरसेवकांकडूनही समर्थन देण्यात आले. तसेच सार्वत्रिक निवडणुकांभावी नगरसेवकांच्या अनुपस्थितीतही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत केलेल्या भरीव कामगिरीचे शिवसेना भाजप महायुतीच्या नगरसेवकांकडून तोंड भरून कौतुक करण्यात आले. ज्यामध्ये शिवसेनेचे सचिन पोटे, विश्वनाथ राणे, अस्मिता मोरे, माया कांबळे यांच्यासह वरुण पाटील, मंदार हळबे, दिपेश म्हात्रे, दया गायकवाड या भाजप नगरसेवकांनीही खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक करत अभिनंदन प्रस्तावाला अनुमोदन दिले.

तर शिवसेनेचे कल्याण पूर्वेतील वरिष्ठ नगरसेवक निलेश शिंदे यांनी या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नागरी सत्काराची सूचना सभागृहात केली. ज्याचे सर्वच सदस्यांनी जोरदार स्वागत करून नागरी सत्काराची ही सूचना उचलून धरली. ज्याला महापौर ॲड. हर्षाली थविल- चौधरी आणि उपमहापौर राहुल दामले यांनीही समर्थन देत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नागरी सत्काराचा ठराव मंजूर केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा