Home ठळक बातम्या सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद ; भारतीय जवानांच्या सन्मानार्थ विमल ठक्कर...

सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद ; भारतीय जवानांच्या सन्मानार्थ विमल ठक्कर यांचेही रक्तदान

नवी दिल्ली | ९ ऑगस्ट :
भारतीय सैन्याच्या शूर जवानांप्रती आदर, कृतज्ञता आणि राष्ट्रसेवेची भावना व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा – वर्ष २’ या विशेष अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऑगस्ट क्रांती दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर दिल्ली कॅन्ट येथील बेस हॉस्पिटलमध्ये या महारक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात आले. (Saluting the Valour of Indian Soldiers Through Blood Donation! Vimal Thakkar Donates Blood in Delhi During ‘Sindoor Army Maha Raktadan Yatra’)

या अभियानात शिवसेना व्यापारी सेल, कल्याणचे अध्यक्ष विमल ठक्कर यांनीही प्रत्यक्ष रक्तदान करून भारतीय सैन्याच्या शूर जवानांप्रती आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ रक्तदान करण्याचा हा उपक्रम राष्ट्रसेवेच्या भावनेला अधोरेखित करणारा ठरला.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील पैलवान तसेच विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने या महारक्तदान अभियानात सहभाग घेतला. जवानांच्या सन्मानासाठी आयोजित या उपक्रमातून समाजातील विविध घटकांना राष्ट्रसेवेशी जोडण्याचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

९ ऑगस्टच्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘सेवा, समर्पण आणि राष्ट्र प्रथम’ हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून राष्ट्रसेवेचा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला.

“देशाच्या रक्षणासाठी आपले जवान आपले सर्वस्व अर्पण करतात. त्यांच्या सन्मानार्थ रक्तदान करणे ही माझ्यासाठी सेवा, कृतज्ञता आणि अभिमानाची बाब आहे. राष्ट्र आणि आपले सैनिक सदैव सर्वोच्च असल्याची भावना विमल ठक्कर यांनी रक्तदान केल्यानंतर व्यक्त केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा