अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राजेश राजू, क्नि – हिप रिप्लेसमेंट स्पेशालिस्ट डॉ. भरत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वी उपचार
कल्याण | २ ऑक्टोबर :
वाढत्या वयाबरोबर गुडघेदुखीची समस्या अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी दैनंदिन जीवनातील मोठा अडथळा ठरते. चालणे, जिने चढणे किंवा साधी दैनंदिन कामे करतानाही होणाऱ्या वेदनांमुळे जीवनमानावर परिणाम होतो. अशाच गुडघेदुखीने ३ वर्षांपासून त्रस्त असलेल्या एका वयस्कर महिलेवर कल्याणातील सुप्रसिद्ध आयुष हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. (Successful Robotic Knee Surgery Performed on Elderly Woman at Ayush Hospital in Kalyan)
साधारणपणे गेल्या ३ वर्षापासून ही महिला गुडघे दुखीमुळे व्यवस्थितपणे चालू शकत नव्हती. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राजेश राजू यांच्यासह क्नि आणि हिप रिप्लेसमेंट स्पेशालिस्ट डॉ. भरत कुमार यांच्या माध्यमातून ही रोबोटिक गुडघे शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य यांच्या माध्यमातून रुग्णाच्या गुडघ्याच्या समस्येवर प्रभावी उपचार करण्यात आले.
रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना अधिक अचूक नियोजन आणि आवश्यक त्या भागावर नियंत्रित पद्धतीने उपचार करण्यास मदत होते. विशेषतः गुडघ्याच्या सांध्याशी संबंधित समस्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचारांची अचूकता वाढविण्यास मदत होत असल्याचे डॉ. राजेश राजू यांनी सांगितले.
या यशस्वी उपचारामुळे दीर्घकाळ गुडघेदुखीचा सामना करणाऱ्या या वयस्कर महिलेला मोठा दिलासा मिळाला असून या महिलेसह तिच्या कुटुंबियांनी डॉक्टरांसह आयुष हॉस्पिटलचे आभार व्यक्त केले आहेत. विशेष म्हणजे आयुष हॉस्पिटलमधील अत्याधुनिक ऑर्थोपेडिक उपचारपद्धती ज्येष्ठ नागरिकांसाठी उपचाराचा महत्त्वाचा पैलू ठरला आहे.
कल्याणातील आयुष हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानासोबत अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विविध गंभीर आजारांवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.

