
हृदयविकारासह मेंदूशी संबंधित रुग्णांना आता ठाणे-मुंबईला जाण्याची गरज नाही
कल्याण दि.16 मार्च :
गेल्या 17 वर्षांपासून कल्याणसह आसपासच्या परिसरातील रुग्णांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मिरा हॉस्पिटल’च्या नव्या अत्याधुनिक रुग्णालयाचे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. डॉ. गौतम गणवीर आणि डॉ. दिपीका गणवीर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ‘मिरा झेन हॉस्पीटल’ या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. (Grand Inauguration of the New ‘Mira Zen Hospital’ Equipped with a State-of-the-Art Cath Lab; Patients with Heart and Brain-related Ailments No Longer Need to Travel to Thane or Mumbai)
मिरा झेन हॉस्पीटल नावाने सुरू झालेले हे सुसज्ज रुग्णालय जुन्या रुग्णालयापासून जवळ असलेल्या भानूनगर परिसरातील सर्वोदय गार्डन येथील पूर्वीच्या विनायक हॉलच्या प्रशस्त जागेत हे नवे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आहे. जुन्या रुग्णालयामध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे जागेची कमतरता जाणवत होती. त्यामुळे अधिक सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानासह नव्या जागेचा शोध घेण्यात आला आणि त्यातूनच या नव्या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. विशेष म्हणजे हे नवे रुग्णालय जुन्या हॉस्पिटलपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरच आहे. मिरा हॉस्पिटल गेल्या १७ वर्षांपासून कल्याणसह आसपासच्या रुग्णांना डॉ. गौतम गणवीर, डॉ. दीपिका गणवीर यांच्या माध्यमातून आपुलकीची आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा देत आहे.

आता नव्या ‘मिरा झेन हॉस्पिटल’मुळे या आरोग्यसेवेला आणखी आधुनिक स्वरूप मिळाले आहे. अत्याधुनिक आणि उच्च दर्जाची इमेजिंग आणि इंटरव्हेंशन प्रणाली असणारी Philips Azurion 5C12 यंत्रणा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी उपलब्ध असणारे मिरा झेन हॉस्पीटल हे ठाणे जिल्ह्यातील पहिले तर महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय ठरले आहे. हृदयविकारांसह न्यूरोइंटरव्हेंशनल (मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजार) ही यंत्रणा अचूक इमेजिंग, कमी रेडिएशन आणि आजाराबाबत विस्तृत निदान करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते. कल्याणात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध झाल्याने आता हृदयविकाराच्या रुग्णांना उपचारासाठी ठाणे किंवा मुंबईला जाण्याची आवश्यकता उरणार नाही. तसेच हृदयविकाराशी संबंधित सर्व तपासण्या आणि उपचार आता सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याची माहिती डॉ. गौतम गणवीर आणि डॉ. दिपीका गणवीर यांनी यावेळी दिली.

याशिवाय, मिरा झेन रुग्णालयातील आयसीयू कक्षही आधुनिक क्रिटिकल केअर सुविधांनी सुसज्ज असून रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत या रुग्णालयातील आयसीयूमध्ये देशातील पहिले ‘हॅलो एअर प्युरिफिकेशन’ यंत्र बसविण्यात आले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आयसीयूमधील हवेचे शुद्धीकरण होऊन रुग्णांना संसर्गापासून संरक्षण मिळण्यास मोठी मदत होणार आहे. आय सी यू कक्षात असे प्रगत तंत्रज्ञान बसविणारे मिरा झेन रुग्णालय हे देशातील पहिलेच रुग्णालय ठरले आहे.
नव्या सुविधा, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या सेवेमुळे मिरा झेन हॉस्पिटल परिसरातील नागरिकांसाठी एक विश्वासार्ह आणि अत्याधुनिक आरोग्यकेंद्र म्हणून उभे राहणार असल्याची भावना यावेळी आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी डॉ. गौतम गणवीर, डॉ. दीपिका गणवीर, डॉ. अशरफ, डॉ. रेहनुमा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर कल्याणातील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी या नव्या रुग्णालयासाठी मिरा हॉस्पिटलच्या टीमचे अभिनंदन केले आहे.



























