Home ठळक बातम्या महाराष्ट्र दिनानिमीत्त कल्याण मॉम्मीज ग्रुपकडून फ्लॅशमॉबच्या माध्यमातून अनोखी मानवंदना

महाराष्ट्र दिनानिमीत्त कल्याण मॉम्मीज ग्रुपकडून फ्लॅशमॉबच्या माध्यमातून अनोखी मानवंदना

कल्याण दि.2 मे :
1 मे च्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कल्याण मॉम्मीज ग्रुपने अनोख्या फ्लॅशमॉबच्या माध्यमातून मानवंदना दिल्याचे दिसून आले. काही महिन्यांपूर्वीच लोकार्पण झालेल्या कल्याणच्या सिटी पार्कच्या प्रांगणात प्रथमच हा अनोखा आणि जोशपूर्ण कार्यक्रम सादर करण्यात आला. त्याचबरोबर आपले राष्ट्रीय कर्तव्य असलेल्या मतदानाबाबतही यावेळी या महिला वर्गाने जनजागृती केली. (On the occasion of Maharashtra Day, Kalyan Mommies Group gave a unique celebration through Flashmob)

कल्याणातील महिला वर्गाला आपल्या रोजच्या रहाट गाडग्यातून बाहेर काढून नव्या आणि आनंददायी क्षणांची अनुभूती मिळण्याच्या उद्देशाने निकिता भोईर यांनी हा कल्याण मॉम्मीज ग्रुप तयार केला आहे. या कल्याण मॉम्मीज ग्रुपकडून नेहमीच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून काल असलेल्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येथील सिटी पार्क परिसरात हा फ्लॅश मॉबचा अनोखा प्रयोग करण्यात आला. कल्याणातील रोअर डान्स अँड फिटनेस स्टुडिओच्या भरत पोफळकर यांच्या सहाय्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

पाहा व्हिडिओ खालील लिंकवर 👇👇
https://www.facebook.com/share/r/uchhnqnmYTungxGR/?mibextid=oFDknk

या फ्लॅशमॉबसाठी गृपमधील सहकारी महिलांनी आपली नोकरी, घर आणि संसार सांभाळून त्याचा कसून सराव केला होता. ज्याला त्यांच्या कुटुंबीयांचीही अत्यंत मोलाची मिळाल्याची माहिती निकिता भोईर यांनी दिली.

कल्याण मॉम्मीज या ग्रुपची क्रिएटर आणि ॲडमिन निकिता भोईर यांनी कल्याणातील मातांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा ग्रुप स्थापन केला आहे. तर मुलांच्या संगोपनात एकमेकींना सहाय्य तसेच व्यवसाय करणाऱ्या मातांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कामही या ग्रुपकडून केले जात आहे. येत्या काळातही अशाच प्रकारचे वैविध्यपूर्ण उपक्रम सादर करणार असल्याचा मानस यावेळी कल्याण मॉम्मीज ग्रुपकडून एलएनएनशी बोलताना व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्र दिनाच्या या कार्यक्रमासाठी केडीएमसी मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त दिलीप सोनवणे, ब वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त सोनल देशमुख तसेच कौस्तुभ बराठे यांचे विशेष सहकार्य लाभले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा