Home ठळक बातम्या “देशाच्या डिजिटल भविष्याला आकार देण्यासाठी जिओ 5जी ची महत्त्वाची भूमिका”

“देशाच्या डिजिटल भविष्याला आकार देण्यासाठी जिओ 5जी ची महत्त्वाची भूमिका”

कल्याणच्या साकेत महाविद्यालयात झाला सेलिब्रेटिंग फ्युचर सोहळा

कल्याण दि.26 ऑगस्ट :
5जी तंत्रज्ञानामुळे गेमिंगसह शिक्षण, उद्योग, आरोग्यसेवा आदी प्रमूख क्षेत्रात लक्षणीय बदल होणार आहेत. त्यामुळे देशाच्या डिजिटल भविष्याला आकार देण्यामध्ये जिओ 5 जी महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास सुप्रसिद्ध डिजिटल एक्सपर्ट सौरभ परमार यांनी व्यक्त केला. कल्याण पूर्वेतील साकेत महाविद्यालयात झालेल्या सेलिब्रेटिंग दि फ्युचर या कार्यक्रमाद्वारे त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. (“Jio 5G’s Key Role in Shaping the Digital Future of the Country”)

देशामध्ये काही महिन्यांपूर्वी जिओ कंपनीने 5जी तंत्रज्ञान लाँच केले आहे. या 5 जी तंत्रज्ञानाचा केवळ आपल्या देशाच्याच नव्हे तर आपल्या जीवनावरही मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे येत्या काळात रोजगाराच्या एआर (augmented reality), व्हीआर (virtual reality) आय ओ टी (internet of things) आदी नवनवीन संधीही उपलब्ध होणार असल्याचे परमार यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

तर यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनीही जिओ 5जी मुळे कम्युनिकेशन, एंटरटेमेंट, ट्रान्सपोर्टेशन आदी क्षेत्रात काय बदल होतील?, जियो ट्रू 5जी सेवेचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार ? 2जी मुक्त भारतासाठी जियोने काही योजना आखली आहे का? असे विविध प्रश्न यावेळी विचारून अधिक माहिती जाणून घेतली.

यावेळी साकेतच्या सीईओ शोभा नायर, प्रिंसिपल डॉ. वसंत बऱ्हाटे, साकेत इन्स्टिट्युटचे संचालक डॉ. सनोज कुमार, डीन डॉ. श्रिकेश यांच्यासह जिओचे जेसीएम हेमंत भयानी, एमएसएल अजय शर्मा, ए बी एच अंकित मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा