Home क्राइम वॉच डोंबिवलीत डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

डोंबिवलीत डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

डोंबिवली दि.2 जुन :
डोंबिवली पश्चिमेच्या सम्राट अशोक चौकात एका डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. स्नेहा दाभिलकर असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून आज दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. (Dombivli accident – A woman died in a collision with a two-wheeler in Dombivli)

डोंबिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या स्नेहा दाभिलकर या त्यांचे पती सुधीर यांच्यासोबत पासपोर्ट कार्यलयात चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास तेथून ते परतत असताना डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट अशोक चौकात त्यांच्या दुचाकीला एका डंपरने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या स्नेहा यांना उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर या अपघातात त्यांचे पती सुधीरदेखील जखमी झाले आहेत.
याप्रकरणी विष्णूनगर पोलीसानी ट्रक चालकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा