Home ठळक बातम्या कल्याणच्या केंब्रीया इंटरनॅशनल शाळेचे सायन्स कार्निवल ; विद्यार्थ्यांनी सादर केले एकाहून एक...

कल्याणच्या केंब्रीया इंटरनॅशनल शाळेचे सायन्स कार्निवल ; विद्यार्थ्यांनी सादर केले एकाहून एक सरस प्रोजेक्ट

कल्याण दि.18 डिसेंबर :

स्पेस डेब्रिज, बायोप्लॅस्टिक, हायपरलूप, रोबोटिक्स अशा अनेक विषयांबाबत आपल्यापैकी अनेकांना पुसटशी कल्पनाही नसेल. मात्र कल्याणातील केंब्रिया इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांनी या विषयांवर एकाहून एक उत्कृष्ट असे प्रोजेक्ट सादर करत आपल्यातील बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली. निमित्त होते ते केंब्रिया इंटरनॅशनल शाळेच्या सायन्स कार्निवलचे. (Science Carnival of Cambria International School, Kalyan)

कल्याणातील नामांकित केंब्रिया इंटरनॅशनल ही शाळा आपल्या जागतिक दर्जाच्या आणि आऊट ऑफ द बॉक्स शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. केवळ पुस्तकी ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा भविष्याची गरज ओळखून ही शाळा आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी सज्ज करत आहे. त्यातूनच मग अनेकांना अवघड वाटणारा सायन्ससारखा विषय विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकवण्याचा सुदंर प्रयत्न शाळेकडून केला जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील पहिली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर बनवलेले तब्बल 40 सायन्स प्रोजेक्ट या दोन दिवसांच्या सायन्स कार्निवलमध्ये मांडण्यात आले होते. ज्यामध्ये स्पेस गार्बेज, बायोप्लॅस्टिक, हायपरलूप, रोबोटिक्स, चांद्रयान, ॲस्ट्रोफिजिक्स, फिट फॉर लाईफ अशा जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या विषयांचाही समावेश होता. या सायन्स कार्निवलला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आपल्या पाल्यांनी सादर केलेले असे उत्कृष्ट सायन्स प्रकल्प पाहून पालकही आश्चर्यचकित झाले होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही कल्याणात विविध प्रकारचे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कसे आणता येतील या उद्देशाने आम्ही गेल्या 5 वर्षांपासून हे सायन्स कार्निवल आयोजित करत आहोत. यामध्ये सादर झालेले सायन्स प्रोजेक्ट आमच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांच्या माध्यमातून बनवले आहेत. विशेष म्हणजे आपण मेक इन इंडीया म्हणतोय किंवा सायन्सचे भविष्यातील जे करिअर आहेत त्याविषयी आपण यातून माहिती देतोय. भारतामध्ये कोणत्या गोष्टी बनल्या पाहिजेत हे या सायन्स कार्निवलच्या माध्यमातून आम्ही कल्याणकरांसमोर आणत असल्याची प्रतिक्रिया सुप्रसिद्ध शिक्षण अभ्यासक आणि पोटे ग्रुपचे सीएमडी बिपिन पोटे यांनी यावेळी दिली.

हे सायन्स कार्निवल यशस्वी करण्यासाठी शाळेच्या संचालिका मीनल पोटे, मुख्याध्यापिका हिना फाळके यांच्यासह सबिता राव,अमोल शिंदे, विवेक माने, सूर्यलता शेट्टी, रत्ना मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा