Home ठळक बातम्या क्रेडाई एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटच्या 13 व्या प्रदर्शनाला दिमाखदार सुरुवात

क्रेडाई एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटच्या 13 व्या प्रदर्शनाला दिमाखदार सुरुवात

35 विकासकांकडून 150 प्रकल्पांचा समावेश

कल्याण दि.8 फेब्रुवारी :
गेल्या एक तपापासून म्हणजेच 12 वर्षांपासून कल्याण डोंबिवलीकरांचे गृहस्वप्न सत्यात उतरवणाऱ्या क्रेडाई एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटच्या प्रदर्शनाला आजपासून दिमाखदार सुरुवात झाली. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या प्रमूख उपस्थितीत 13 व्या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले.

यंदाच्या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर ते ठाणा, शिळफाटा रोड परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे बघण्याची संधी घर घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना मिळणार आहे. त्यातही अवघ्या १६ लाखांपासून ते थेट १ करोड रुपयांपर्यंतच्या किमतीची घरे या प्रदर्शनात उपलब्ध आहेत.

माध्यमवर्गीय ग्राहकांच्या बजेटमध्ये बसतील आणि सर्वांना परवडतील अशी मनाजोगी घरे देण्याचा प्रयत्न क्रेडाई एससीएचआय कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यंदाच्या एक्स्पोमध्ये ४० हुन अधिक विकासकांचे १५० हुन अधिक प्रोजेक्ट एकाच छताखाली बघता येणार आहे. गेल्या काही वर्षाचा अंदाज बघता या प्रदर्शनालाही २५ हजारांहून अधिक नागरीक भेट देतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवला आहे. यावर्षी स्पॉट बुकिंग डिस्काउंटसह प्रत्येक तासाला एक लकी ड्रॉदेखील काढला जाणार आहे.
आजपासून सुरू झालेलं हे प्रदर्शन येत्या 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर आदी मान्यवर भेट देणार आहेत.

आजच्या उद्घाटन सोहळ्याला रवी पाटील, सुनिल चव्हाण, अरविंद वरक, मिलिंद चव्हाण यांच्यासह अनेक नामांकित व्यावसायिक उपस्थित होते.

पसंतीचे घर घेण्यासाठी भेट द्या – भरत छेडा
आमचे सिक्युरिटी डिपॉझिट चुकीच्या पद्धतीने घेतले जायचे हा आमचा प्रश्न केडीएमसी आयुक्त यांनी सोडवला आहे. यंदाच्या एक्स्पोमध्ये दिडशे पेक्षा अधिक प्रकल्प प्रॉपर्टी प्रदर्शनात मांडण्यात आले असून 100 टक्के स्टॉल बुकिंग झालं आहे. इच्छुक ग्राहकांनी आपल्या पसंतीचे घर घेण्यासाठी भेट देण्याचे आवाहन एमसीएचआय क्रेडाई कल्याण डोंबिवली युनिटचे अध्यक्ष भरत छेडा यांनी केले.

खासगी क्षेत्राने या कामात पुढाकार घ्यावा – केडीएमसी आयुक्त
शासन आणि खासगी क्षेत्राने एकत्र येऊन कल्याण शहराला आणखी चांगले कसे करता येईल यासाठी सहकार्य करुया. यामध्ये काही सामाजिक उपक्रम माणसं
ज्या सर्व गोष्टी नियमांत बसत असतील त्याला आपले सहकार्य असणार. सोबतच ज्याठिकाणी महापालिकेला निधी कमी पडेल तिकडे आपण सीएसआर फंडातून निधी देण्यासाठी पुढाकार घ्यावा. आजच्या काळात सर्वांना सोयी सुविधा द्यायच्या असतील तर संघटित आणि नियोजनात्मक विकासाशिवाय पर्याय नाहीये असे आवाहन केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा