Home ठळक बातम्या फडके रोडपाठोपाठ डोंबिवलीचे श्री गणेश मंदिरही निघाले आकर्षक रोषणाईने उजळून

फडके रोडपाठोपाठ डोंबिवलीचे श्री गणेश मंदिरही निघाले आकर्षक रोषणाईने उजळून

मनसे आमदार राजू पाटील यांच्या वतीने विद्युत रोषणाई

डोंबिवली दि.11 नोव्हेंबर :
डोंबिवलीकरांचे ग्राम दैवत असलेले श्री गणेश मंदिर आणि डोंबिवली शहराची सांस्कृतिक ओळख असणारा फडके रोड यंदा आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. श्री गणेश मंदिर संस्थानचे यंदाचे शतक महोत्सवी वर्ष असल्याने फडके रोडप्रमाणेच मंदिर आणि मंदिर परिसरालाही मनसे आमदार राजू पाटील यांच्या संकल्पनेतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

हिंदू नववर्ष अर्थातच गुढीपाडवा आणि दिपावलीनिमित्त डोंबिवलीच्या फडके रोडवर मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकर एकत्र येत असतात. त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून विशेष आकर्षक रोषणाई केली जात आहे. त्यातच यंदा डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर संस्थानचे शतक महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त मनसे आमदार राजू पाटील यांनी मंदिर परिसरालाही विद्युत रोषणाई करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी देवस्थानसमितीने देखील तात्काळ मान्यता दिली होती. त्यानुसार फडके रोडप्रमाणे गणेश मंदिर आणि परिसरालाही अतिशय नयनरम्य अशी रोषणाई करण्यात आली आहे.

शुक्रवारी सायंकाळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, गणेश मंदिर संस्थांच्या अध्यक्षा अलका मुतालिक,विश्वस्त राहुलजी दामले यांच्या हस्ते या विद्युत रोषणाईने लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत, मनसे प्रदेश उपाध्यक्षा दिपीका पेडणेकर,जिल्हा संघटक हर्षद पाटील, उपजिल्हाध्यक्ष सुदेश चुडनाईक, योगेश पाटील, डोंबिवली विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे, ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, उदय वेळासकर, शहर सचिव संदीप म्हात्रे, महिला शहर सचिव कोमल पाटील आणि मोठ्या संख्येने मनसैनिक तसेच डोंबिवलीकर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा