Home क्राइम वॉच कल्याण स्टेशनवर सापडले तब्बल 54 डीटोनेटर्स ; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

कल्याण स्टेशनवर सापडले तब्बल 54 डीटोनेटर्स ; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

स्फोटकांसाठी होतो डीटोनेटर्सचा वापर

कल्याण दि.21 फेब्रुवारी :
मध्य रेल्वेवरील अत्यंत गर्दीचे आणि वर्दळीच्या स्टेशनपैकी एक असणारे कल्याण रेल्वे स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकजवळ तब्बल 54 डीटोनेटर्स सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्फोटकांसाठी वापर होणारी ही डीटोनेटर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडल्याने पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत. (As many as 54 detonators found at Kalyan station; Police system on alert mode)

आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कल्याण स्टेशनच्या एक नंबर प्लॅटफॉर्मजवळील एस्केलेटरजवळ काही बॉक्स संशयास्पदपणे ठेवण्यात आल्याचे सफाई कर्मचाऱ्याला आढळून आले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनीही बॉम्ब डिटेक्शन अँड डीस्पोझल स्कॉड ( बीडीडीएस BDDS ) ला पाचारण केले. त्यावर या पथकातील डॉग स्कॉडने या बॉक्सची तपासणी केल्यावर हे बॉक्स उघडण्यात आले. त्यावेळी आतमध्ये तब्बल 54 डीटोनेटर्स ठेवण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आल्याची माहिती रेल्वे पोलिसांतर्फे देण्यात आली.तसेच खदानी , विहिरी आदी परिसरात स्फोट घडविण्यासाठी अशा डीटोनेटर्सचा वापर केला जात असल्याची प्राथमिक माहितीही पोलीसांनी दिली आहे.

मात्र सध्याची एकंदर परिस्थिती पाहता इतक्या मोठ्या प्रमाणात हे डीटोनेटर्स कोणी ठेवले ? त्याचा उद्देश घातपात घडवण्याचा होता का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण झाले आहेत. तर या घटनेनंतर रेल्वे परिसरातील पोलीस बंदोबस्त आणखी चोख करण्यात आला असून स्थानिक पोलिसही या घटनेमुळे सतर्क झाले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा