Home ठळक बातम्या महाविकास आघाडीविरोधात कल्याणमध्ये भाजपाचे आंदोलन

महाविकास आघाडीविरोधात कल्याणमध्ये भाजपाचे आंदोलन

कंत्राटी भरतीच्या जीआरची केली होळी

कल्याण दि.21 ऑक्टोबर :
महाविकास आघाडीतील सरकारने केलेली पापं भाजपाच्या माथी फोडण्याचा प्रयत्न सध्या चालवल्याचे सांगत कल्याण जिल्हा भाजपातर्फे आज महाविकास आघाडीविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बनवण्यात आलेल्या जीआरची होळीही करण्यात आली. (BJP agitation in Kalyan against Mahavikas Aghadi)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये कंत्राटी भरतीचा कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळात संमत झाल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले. तसेच महाविकास आघाडीतील नेते आता महायुती सरकार विरोधात लोकांमध्ये संभ्रम पसरवत असल्याचा घडाघाती आरोप करत फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे नेत्यांनी माफी मागण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर राज्यात ठीकठिकाणी भाजपतर्फे महाविकास आघाडी आणि त्यातील नेत्यांचा निषेध केला जात आहे. कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कल्याण जिल्हा भाजपातर्फे असेच निषेध आंदोलन करण्यात आले. शरद पवार हाय हाय, उद्धव ठाकरे हाय हाय,महाविकास आघाडीचा निषेध असो अशी घोषणाबाजी यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली.

तर कंत्राटी भरतीचा जीआर 2003 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातच संमत झाला होता. तरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विद्यमान महायुती सरकारवर विनाकारण कंत्राटी भरतीचे आरोप आरोप केले जात आहेत. याबद्दल महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी यावेळी केली.

या आंदोलनामध्ये भाजपाचे कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, कल्याण पश्चिमचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्यासह भाजपचे अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा