Home क्राइम वॉच कल्याण पूर्वेतील अंमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीविरोधात भाजपचा मोर्चा

कल्याण पूर्वेतील अंमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीविरोधात भाजपचा मोर्चा

कल्याण दि.5 ऑक्टोबर :
कल्याण पूर्वेतील अंमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीविरोधात आक्रमक झालेल्या भाजपने मोर्चा काढत आंदोलन केलेलं पाहायला मिळाले. कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या मोर्चात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कल्याण पूर्वेत गेल्या काही वर्षांमध्ये अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अल्पवयीन मुलांना त्याची सवय लावायची आणि त्यांना अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडायचे हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी अनेक चांगल्या घरातील मुलं या व्यसनाला बळी पडत असून अनेकांची कुटुंब उद्धवस्त होत आहेत. यावर शासनाचे लक्ष वेधण्यासह आणि पोलीस यंत्रणेने परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच ताडउपाय योजना करण्याची मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी केली.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे मंडल उपाध्यक्ष विजय उपाध्याय अरुण दिघे, पांडुरंग भोसले, नितेश म्हात्रे, माजी नगरसेवक विक्रम तरे, गुड्डू खान, प्रदेश सदस्य संदीप तांबे, महिला मंडळ अध्यक्ष प्रिया जाधव. वंदना मोरे, मीना कोठेकर, अर्चना नागपुरे, नीता सिंग आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा