Home Uncategorised डम्पिंगवर सापडल्या डिझेल भरलेल्या बाटल्या; डिझेल आगीसाठी की चोरीसाठी हे अद्याप अस्पष्ट

डम्पिंगवर सापडल्या डिझेल भरलेल्या बाटल्या; डिझेल आगीसाठी की चोरीसाठी हे अद्याप अस्पष्ट

कल्याण दि. 30 मार्च :
कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राउंडवर डिझेल भरलेल्या बाटल्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. डिझेलने काठोकाठ भरलेल्या या बाटल्या आग लावण्याच्या उद्देशाने ठेवल्या होत्या की डिझेल चोरीच्या उद्देशाने याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही.

गेल्या आठवड्यात वाडेघर डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग लागली होती. ही आग इतकी मोठी होती की तिच्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल 3 ते 4 दिवस लागले. आग नियंत्रणात आल्यानंतर अग्निशमन दलातर्फे याठिकाणी गेल्या शनिवारी कुलिंगचे काम सुरू होते. त्यावेळी खाडी किनाऱ्याकडील बाजूला ठराविक कचऱ्यामध्ये ठराविक अंतर राखून या बाटल्या खोचून ठेवण्यात आल्या होत्या. डिझेलने काठोकाठ भरलेल्या या बाटल्या पाहून अग्निशमन कर्मचारीही अवाक झाले. त्यांनी यासंदर्भात केडीएमसीच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.

दरम्यान यासंदर्भात घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांची एलएनएनने प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी या प्रकाराला दुजोरा दिला आहे. हा प्रकार खरा असून या डिझलेच्या बाटल्या कचऱ्याला आग लावण्यासाठी होत्या की चोरीच्या उद्देशाने हे पुढील तपासात समजेल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच घडलेल्या प्रकराबाबत पोलीस स्टेशनलाही चौकशी करण्याचे पत्र देणार असल्याचे त्यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा