Home क्राइम वॉच नियंत्रण सुटल्याने कारची स्कुटीसह फळांच्या गाड्यांना धडक; आधारवाडी जेल परिसरातील घटनेत मायलेकी...

नियंत्रण सुटल्याने कारची स्कुटीसह फळांच्या गाड्यांना धडक; आधारवाडी जेल परिसरातील घटनेत मायलेकी झाल्या जखमी

कल्याण दि.27 फेब्रुवारी :
कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दिलेल्या धडकेमध्ये माय लेकी जखमी झाल्याची घटना कल्याण पश्चिमेच्या जेल परिसरात घडली. ब्रेकऐवजी एकसिलेटर दाबले गेल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कल्याणच्या गांधारी पुलावरून ही कार आधारवाडीच्या दिशेने येत होती. त्यावेळी जेल परिसरातील चौकात ही कार आल्यानंतर अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या गाडीने उजवीकडे वळत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कुटीला धडक दिली. तसेच त्याशेजारी उभ्या असणाऱ्या फळाच्या गाड्यांनाही या कारने मागील फुटपाथवर फरफटत नेले.
या अपघातात या स्कूटीवर असलेल्या मायलेकीना मोठी दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची नावे समजू शकली नाहीत. शाळेतून सुटलेल्या आपल्या मुलीला घेऊन त्या घरी चालल्या होत्या.
तर या गाडीचा चालक स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा