Home ठळक बातम्या डोंबिवलीतील नांदिवली नाला ते स्वामी समर्थ चौकादरम्यान वाहतूकीत बदल

डोंबिवलीतील नांदिवली नाला ते स्वामी समर्थ चौकादरम्यान वाहतूकीत बदल

 

डोंबिवली दि.७ जानेवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील डोंबिवली पूर्वेच्या नांदिवली नाला ते स्वामी समर्थ चौकादरम्यान टप्प्याटप्प्याने सिमेंट कॉकिटीकरण आणि भूमिगत नाल्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी इथल्या वाहतूकीत बदल करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. (Change in traffic between Nandivali Nala and Swami Samarth Chowk in Dombivli)

इथल्या वाहतूकीत असे आहेत बदल…

प्रवेश बंद – नांदिवली नाला येथून स्वामी समर्थ चौक, साईबाबा सागाव कल्याण शिळ रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व – प्रकारच्या वाहनांना लक्ष्मीकांत रेस्टॉरंट समोर प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – याऐवजी ही वाहने नांदिवली नाला येथून डाव्या बाजूने वळण घेवून नांदिवली नाला समांतर रस्त्याने गाधीनगर चौक, स्वामी समर्थ मठ, पीएनटी चौक मार्गे इच्छीत स्थळी जावू शकतील.

प्रवेश बंद – स्वामी समर्थ चौक येथून डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ओम साई जम्बो वडापाव सेंटरसमोरून प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – त्याऐवजी ही वाहने स्वामी समर्थ चौक येथून उजव्या बाजूला वळण घेवून पी अॅण्ड टी कॉलनी, गांधीनगर चौक मार्गे इच्छीत स्थळी जाऊ शकतील.

वेगमर्यादा – नांदिवली नाल्याच्या डाव्या बाजूस वळण घेऊन नाला समांतर हाइवे रोडने गांधीनगर चौक, स्वामी समर्थ मठ, पी. एन. टी. चौक पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वेगमर्यादा ताशी 30 कि.मी. करण्यात आली आहे.

ही अधिसुचना 5 जानेवारी 2023 पासून रस्त्याचे सिमेंट कोक्रिटीकरण आणि भूमिगत नाल्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा