Home ठळक बातम्या कल्याण शहरावर दाट धुक्याची चादर; मात्र हवेची गुणवत्ता खालावली

कल्याण शहरावर दाट धुक्याची चादर; मात्र हवेची गुणवत्ता खालावली

कल्याण दि.18 ऑक्टोबर :

कल्याण शहर आणि आसपासच्या परिसरात आज सकाळपासून दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला असला, तरी शहरातील हवेची गुणवत्ता मात्र खालवल्याचे AQI INDEX निर्देशांकावरून दिसून येत आहे.(Dense fog blankets Kalyan city; But the air quality has deteriorated)

गेल्या दोन दिवसांपासून कल्याण शहर परिसरात धुके पडण्यास सुरुवात झाली सुरुवात झाली. परंतु आज सकाळी पडलेले धुके अधिक गडद असल्याचे जाणवले ज्यामध्ये कल्याण शहरात गेल्या काही वर्षात उभ्या राहिलेल्या गगनचुंबी इमारती हरवून गेल्याचे दिसून आले. सकाळच्या सुमारास सकाळच्या सुमारास नियमितपणे बाहेर पडलेल्या नागरिकांना या धुक्यामुळ सुखद धक्का बसला. आणि आजची सकाळ आपल्यासाठी काहीशी स्पेशल ठरल्याचे त्यांना जाणवले.

मात्र कल्याणचा एअर क्वालिटी इंडेक्स अर्थातच हवा गुणवत्ता निर्देशांक तपासला असता तो 166 अंकांवरती पोहोचल्याचे दिसून आले. म्हणजेच तो अस्थमा दमा आधी आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच सामान्य नागरिकांसाठी श्वास घेण्यास चांगला नसल्याचेच निर्देशांकाचे हे आकडे दर्शवत आहेत. त्यामुळे सकाळच्या सुमारास नागरिकांनी घराबाहेर पडताना धुक्याचा आनंद जरूर घ्यावा. मात्र त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजीही घ्यावी असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून केले जात आहे.

कारण कल्याण डोंबिवली परिसरात रस्त्यावर पडलेला खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. ज्यामुळे नागरिकांना सर्दी खोकल्यासारखे आजार वारंवार होत असून ते बरे होण्यासाठी मोठा विलंब लागत आहे. यात आता सकाळी पडलेल्या दाट धोक्याची ही भर पडली असून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा