Home ठळक बातम्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठाणे जिल्ह्यात १ हजार १५६ कोटींच्या विकास निधीचे वितरण

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठाणे जिल्ह्यात १ हजार १५६ कोटींच्या विकास निधीचे वितरण

सर्वपक्षीय आमदारांना मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून भरघोस निधी

डोंबिवली दि.19 फेब्रुवारी:
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात १ हजार १५६ कोटी रुपयांच्या विकासनिधीतून कामे सुरू आहेत.जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना आपण भरघोस निधी वाटप केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे जिल्ह्यातील आमदारांना झालेल्या निधी वाटपानुसर शांताराम मोरे 290 कोटी, महेश चौघुले 42 कोटी, किसन कथोरे 287 कोटी, राजू पाटील 127 कोटी, विश्वनाथ भोईर भोईर 27 कोटी, दौलत दरोडा 227 कोटी, गणपत गायकवाड 62 कोटी, कुमार आयलानी 92 कोटी असे मिळून 1 हजार 156 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सर्व कोट्यवधी रुपयांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र कामे सुरू आहेत. मंत्री पदाची शपथ घेतल्यापासून दीड वर्षात राज्यात सर्वत्र विभागामार्फत विकासकामांसाठी प्रचंड निधी देण्यात आला असून ठाणे जिल्ह्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितले.

तर यासह टिळकनगर महाविद्यालय, जोंधळे महाविद्यालय, स वा जोशी महाविद्यालय येथे विधी कॉलेज सुरू करण्यात देखील तांत्रिक परवानग्या मिळवून देण्यात आल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा