Home ठळक बातम्या अखेर आचारसंहितेबाबत सस्पेन्स संपला : लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक उद्या जाहीर होणार

अखेर आचारसंहितेबाबत सस्पेन्स संपला : लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक उद्या जाहीर होणार

उद्या दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली दि.15 मार्च :
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत अखेर सस्पेन्स संपला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे उद्या दुपारी 3 वाजता आगामी लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.(India general elections 2024) (Finally, the suspense over the code of conduct is over: The Lok Sabha election schedule will be announced tomorrow)

यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्याद्वारे ही माहिती दिली आहे. उद्या म्हणजेच 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल आणि त्या क्षणापासून संपूर्ण देशामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. लोकसभा निवडणुकीसोबतच राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीचे वेळापत्रकही जाहीर केले जाणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा