Home ठळक बातम्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री झाले चक्क वाढपी

पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री झाले चक्क वाढपी

कल्याणातील टिफीन बॉक्स बैठकीत कपिल पाटील यांचा साधेपणा

कल्याण दि.१८ जुलै :
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्यातील साधेपणाचे दर्शन घडवले. मोदी @९ कार्यक्रमांतर्गत कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या टिफीन बॉक्स बैठकीत कपिल पाटील चक्क कार्यकर्त्यांना जेवण वाढताना दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षातील विकासकामांची, विविध योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी भाजपातर्फे मोदी@९ कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. भिवंडी लोकसभेच्या ६ विधानसभा मतदारसंघातही या उपक्रमाअंतर्गत नागरिकांबरोबर संवाद साधण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून कल्याणात टिफीन बॉक्स बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिड महिना मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा कोणताही बडेजाव न ठेवता कपिल पाटील यांनी स्वतः यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना आपुलकीने जेवण वाढल्याचे दिसून आले. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या या कृतीने कार्यकर्त्याची मने तर जिंकलीच. पण त्याचसोबत नागरिकांकडूनही त्यांच्या या साधेपणाचे कौतुक केले जात आहे.

यावेळी भाजप कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी आमदार आणि कल्याण पश्चिम विधानसभा प्रमूख नरेंद्र पवार यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा