Home कोरोना ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’: केडीएमसीतर्फे कल्याणात महिलांसाठी मोफत कोवीड लसीकरण

‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’: केडीएमसीतर्फे कल्याणात महिलांसाठी मोफत कोवीड लसीकरण

कल्याण दि.7 मार्च :
उद्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (international womens day) कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कल्याणातील लालचौकी येथील आर्ट गॅलरी कोवीड हॉस्पिटलजवळ महिलांना मोफत कोवीडची लस (free covid vaccination for women on occasion of international womens day by kdmc) दिली जाणार आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उद्या दिवसभर हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन्स वर्कर (सर्व महिला), 45 ते 60 वयोगटातील सहव्याधी असलेल्या महिला आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ महिलांना मोफत कोवीडची लस दिली जाणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार असून सर्व महिलांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी पाटील यांनी केले आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ‘फ्रंटलाईन वर्कर्स आणि हेल्थ लाईन वर्कर्ससाठी सावळाराम क्रिडा संकुल, डोंबिवली आणि शक्तीधाम विलगीकरण केंद्र, कल्याण येथे यापूर्वीच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 60 या वयोगटातील सहव्याधी (Comorbid) असणाऱ्या रुग्णांसाठी रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण पश्चिम आणि शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय, डोंबिवली पश्चिम येथे विनामूल्य लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा