Home ठळक बातम्या एसटीच्या रांगेत केडीएमटीही : बसमध्ये ज्येष्ठ नागरीकांना मोफत प्रवास तर महिलांना 50...

एसटीच्या रांगेत केडीएमटीही : बसमध्ये ज्येष्ठ नागरीकांना मोफत प्रवास तर महिलांना 50 टक्के सवलत

एसटी च्या रांगेत केडीएमटीही : बसमध्ये ज्येष्ठ नागरीकांना मोफत प्रवास तर महिलांना 50 टक्के सवलत

कल्याण डोंबिवली दि.16 मार्च :
राज्य सरकारने एसटी प्रवासामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ज्यापद्धतीने सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर आता कल्याण डोंबिवली परिवहन म्हणजेच केडीएमटी प्रशासनानेही तोच निर्णय घेतला आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. (Free travel for senior citizens and 50 percent discount for women in kdmt)

राज्य सरकारने एसटीमध्ये घेतलेल्या निर्णयावर पाऊल ठेवत केडीएमसी प्रशासनानेही त्याचीच री ओढली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या सर्व बसेसमध्ये ज्येष्ठ नागरीकांना (वय वर्ष ६० आणि त्यापुढील) 100 टक्के (विनामुल्य) प्रवास तर महिलांसाठी प्रवास भाड्यामध्ये ५०टक्के सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्याचा लाभ कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील हजारो महिला प्रवासी आणि वृद्ध नागरिकांना होणार आहे.


पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या धर्तीवर कल्याण महानगर परिवहन महामंडळाची (KMPML) स्थापना…

कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित म्हणजेच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपुर महानगर‍पालिका आणि अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापुर नगरपरिषद यांच्या एकत्रित परिवहन प्राधिकरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण महानगर परिवहन महामंडळाची (KMPML) पीएमपीएमएलच्या धर्तीवर कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (KMPML) स्थापना करण्यात आली. त्याच्या संचालक मंडळाची पहिली बैठक शुक्रवारी संपन्न झाली. या केएमपीएमएलमध्ये महानगरपालिका, नगरपरिषद यांचे महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, आरटीओ, एमएमआरडीएचे प्रतिनिधी, सीआयआरटी पुणेचे संचालक यांचा अंतर्भाव असणार आहे.

तर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या दालनात झालेल्या बैठकीला उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजिज शेख, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य, कुळगाव-बदलापुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत तसेच आरटीओ प्रतिनिधी कदम उपस्थित होते.
या बैठकीत कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (KMPML) च्या संपूर्ण रचना आणि कार्यपध्दतीबाबत संचालक मंडळाला माहिती देण्यात आली.

दरम्यान केडीएमटी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असला तरी केडीएमटीच्या बसेसची रस्त्यांवर दिसणारी कमतरता भरून काढण्याकडे प्रशासनाने आधी लक्ष द्यावे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा