कल्याण दि.22 ऑगस्ट :
कोवीडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी, मिलिंद चव्हाण विचारमंच आणि चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणात मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 22 बेतूरकर पाडा, शिवाजी नगरच्या सप्तश्रृंगी मंदिर परिसरात हे लसीकरण करण्यात आले. या मोफत लसीकरण शिबिरात सुमारे 330 जणांना कोवीड लस देण्यात आल्याची माहिती आयोजक मिलिंद चव्हाण यांनी दिली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि सुनियोजितरित्या झालेल्या लसीकरणामध्ये प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवा वर्ग सहभागी झाल्याचे दिसून आले. आजच्या शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता येत्या काळातही कोवीड लसीकरण मोहीम राबविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आयोजक मिलिंद चव्हाण यांनी दिली.