Home ठळक बातम्या कल्याणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू

कल्याणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू

कल्याण दि.20 सप्टेंबर :
विसर्जनासाठी गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढत असताना विजेचा जोरदार झटका लागल्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कल्याण पश्चिमेच्या एव्हरेस्ट नगर, बेतूरकर पाडा परिसरात घडली. प्रशांत चव्हाण (28) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कल्याण पश्चिमेच्या बेतूरकर पाडा, एव्हरेस्ट नगर परिसरात गेल्या 38 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही या मंडळाकडून भक्तीभावपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी संध्याकाळी या मंडळात विसर्जनाची तयारी सुरू होती. त्याचवेळी जोरदार आलेल्या पावसामुळे मंडपातील लाईट चालू बंद होऊ लागले. ते पाहण्यासाठी मंडळाचा कार्यकर्ता प्रशांत चव्हाण आतमध्ये गेला आणि तिकडे तपासणी सुरू असताना त्याला विजेचा जोरदार शॉक लागला.

त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून इतर कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता प्रशांत खाली पडल्याचे त्यांना दिसून आले. क्षणाचाही विलंब न दवडता कार्यकर्त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एव्हरेस्ट नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा