Home ठळक बातम्या पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिस्थितीचा महापौर आणि आयुक्तांकडून इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर (ICCC)...

पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिस्थितीचा महापौर आणि आयुक्तांकडून इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर (ICCC) द्वारे आढावा

कल्याण डोंबिवली | १ जुलै :
गेले दोन दिवस कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या पर्जंन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका महापौर ॲड.हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी मुख्यालयातील इन्‍टीग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर (ICCC) मधून‍ परिस्थितीचा आढावा घेतला. (Heavy Rain Alert: Mayor and Municipal Commissioner Monitor City Situation via Integrated Command & Control Centre (ICCC)

यावेळी त्यांनी ICCC मध्ये असलेल्या थेट कॅमेरांच्या माध्यमातून परिसराची पाहणी केली, तसेच पाणी साचत असलेल्या ठिकाणी तक्रारींचे निराकारण करण्यासह पूरप्रवण क्षेत्र तसेच पाणी साचत असलेल्या ठिकाणचे सीसीटिव्ही नादुरुस्त असल्यास संबंधित प्राधिकरणाकडून त्वरित दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे कक्षात असलेल्या तक्रारींच्या नोंद वहीची समक्ष पाहणी केली.

४ दिवस येलो अलर्ट, हेल्पलाईन नंबर जारी…
पुढील 4 दिवस ठाणे जिल्हयात शासनाने ऑरेज अलर्ट जाहीर केला आहे. महापालिका मुख्यालयात व महापालिकेच्या सर्व प्रभागात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली असून त्यामध्ये 24X7 कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत. प्राप्त होणा-या तक्रारींच्या अनुषगाने महापालिकेचा कर्मचारी वर्ग निराकरण करत आहे. प्रशासन आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे.
पावसाळी परिस्थितीत कुठलीही तक्रार असल्यास नागरिकांनी महापालिकेच्या 0251-2211866/ 1800-233-0045/ 0251-2211373/ 1800-233-7383/ 1800-233-4392 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा तसेच ऑरेंज अलर्ट जाहिर केल्यामुळे पुढील 4 दिवसात नागरिकांनी कामाशिवाय शक्यतोवर बाहेर पडू नये आणि महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर ॲड.हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी केले.

यासमयी शहर अभियंता अनिता परदेशी , आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, सिस्टीम मॅनेजर प्रमोद कांबळे, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, शैलेश कुलकर्णी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा