
कल्याण दि.4 फेब्रुवारी :
एपेक्स इव्हेंट्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या युथ कबड्डी चॅम्पियनशीप – सीझन 1 या कबड्डी स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. 1 आणि 2 फेब्रुवारी आंबिवलीच्या NRC ग्राउंडवर यशस्वीपणे ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन एपेक्स इव्हेंट्स यांनी तर संस्थापक चेतन हुसाळे यांच्या संकल्पनेतून ती घेण्यात आली. (Huge Response to Youth Kabaddi Championship – Season 1)
स्थानिक युवक खेळाडूंना भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, प्राथमिक स्तरावरून कबड्डी खेळाचा प्रसार करणे, तसेच युवकांमध्ये शिस्त, फिटनेस आणि संघभावना निर्माण करून भविष्यातील राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
स्पर्धेदरम्यान विविध संघांमध्ये रंगतदार सामने पाहायला मिळाले. स्थानिक खेळाडू, प्रशिक्षक तसेच क्रीडाप्रेमी नागरिकांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्तम नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि खेळाडूंनी दाखवलेली कौशल्ये यामुळे ‘यूथ कबड्डी चॅम्पियनशिप – सीझन १’ ही स्पर्धा यशस्वी ठरली.


























