Home ठळक बातम्या शाळेच्या पाठींब्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो – अजिंक्य रहाणेची भावूक पोस्ट

शाळेच्या पाठींब्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो – अजिंक्य रहाणेची भावूक पोस्ट

 

डोंबिवलीतील शाळेला सपत्नीक भेट देत जागवल्या आठवणी

डोंबिवली दि.11 मार्च :
अजिंक्य रहाणे…इंडियन क्रिकेट टिमधील एक आघाडीचे आणि विश्वासक नाव. मूळचा डोंबिवलीकर असणाऱ्या अजिंक्यने नुकतीच डोंबिवलीतील आपल्या शाळेला सपत्नीक भेट देत शाळेशी संबंधित आठवणी जागवल्या. अजिंक्यने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/tv/Ca327VZl6DA/?utm_medium=share_sheet

गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवून देण्यात अजिंक्य रहाणेने मोठा वाटा उचलला होता. मात्र सध्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली आहे. याच मोकळ्या वेळेचा अजिंक्य सध्या सदुपयोग करताना दिसत आहे. मूळचा डोंबिवलीकर असणाऱ्या अजिंक्यच्या मनामध्ये आजही डोंबिवली आणि त्यातही आपल्या शाळेबद्दल तेवढीच आत्मियता आणि विशेष जागा असल्याचे या व्हिडीओतून दिसून येत आहे.

“बऱ्याच वर्षांनंतर आपल्याला इकडे येता आले, इकडूनच आपण आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. आणि या शाळेनेच मला पाठींबा दिल्याची प्रांजळ कबुली अजिंक्यने या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर ज्या मैदानावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली त्यालाही भेट देऊन त्याने शाळा परिसरात बरेचसे बदल झाल्याचे सांगितले. तर जिथपासून आपली सुरुवात झाली त्या मुळांना भेट दिल्याने आपले पाय नेहमीच जमिनीवर राहतात. ही जागा कितीही बदलली असली तरी आपल्या मनामध्ये या जागेच नेहमी तेच स्थान राहील असेही अजिंक्यने या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा