Home ठळक बातम्या वाहतूक नियम पाळा नाही तर घेऊन जाईन ‘; कल्याणात अवतरलेल्या यमराजांचा वाहन...

वाहतूक नियम पाळा नाही तर घेऊन जाईन ‘; कल्याणात अवतरलेल्या यमराजांचा वाहन चालकांना दम

कल्याण शहर वाहतूक पोलिसांची अनोखी जनजागृती

कल्याण दि.५ जानेवारी :
केंद्र तसेच राज्य सरकारकडून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत वारंवार सूचना करूनही अनेक वाहन चालक त्याकडे दुर्लक्ष करत असतात. वाहतूकीचे नियम न पाळल्याने होणाऱ्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामूळे कल्याण शहर वाहतूक पोलिसांतर्फे अनोख्या पद्धतीने लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा हे सांगण्यासाठी थेट यमराजच रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. (If you don’t follow the traffic rules, I will take you’; Yamaraj, who is incarnated in Kalyan, gives breath to the vehicle drivers)

पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवलीत वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक नियमांसंदर्भात जनजागृती केली जात आहे. विना हेल्मेट बाईक चालवणे, सीट बेल्ट न लावता कार चालवणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट गाडी चालवणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे यासारखे अनेक प्रकार सर्रासपणे होत असल्याचे आपल्याला दररोज दिसून येतात. आणि वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्यानेच दररोज अनेक छोटे मोठे अपघातही होत असतात. या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरलेल्या या प्रतिकात्मक यमराजांनी वाहन चालकांना ‘ वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा मी तुम्हाला घेऊन जाईन ‘ अशा शेलक्या शब्दांत आवाहन केले.

हातामध्ये भले मोठे शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरलेले हे यमराज पाहून अनेक वाहन चालक बुचकळ्यात पडले होते. मात्र यमराजाच्या वेषातील या व्यक्तीने नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन वाहतूक नियम पाळण्याचा सल्ला दिला.

दरम्यान केंद्र सरकारच्या (Ncrb) अहवालानुसार भारतामध्ये दर मिनिटाला एक गंभीर स्वरूपाचा अपघात होत होऊन त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक नोंद झाली आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करता ‘ दुर्घटना से देर भली ‘ हाच संदेश या यमराजांनी वाहन चालकांना दिला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा