Home कोरोना खासदार कपिल पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित 18 वर्षांवरील व्यक्तींच्या कोवीड लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त...

खासदार कपिल पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित 18 वर्षांवरील व्यक्तींच्या कोवीड लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण दि. 21 जून:
खासदार कपिल पाटील फाउंडेशनतर्फे कल्याणमध्ये आयोजित 18 ते 29 वयोगटाच्या लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. यापुढील काळात कल्याण शहराबरोबरच बदलापूर आणि भिवंडीत लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली.

राज्य सरकारने १८ ते २९ वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणाला स्थगिती दिली आहे. मात्र या वयोगटातील तरुण-तरुणींची संख्या मोठी असून लघुउद्योग, सेवा क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रातही तरुणांची संख्या लक्षणीय आहे. मात्र हा घटक लसीकरणापासून वंचित राहिला होता. तर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खासगी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या फाउंडेशनतर्फे चिकणघर येथील मंगेशी बॅक्वेट हॉलमध्ये हे लसीकरण शिबिर भरवण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र ज्यांना खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून लस घ्यायची आहे, त्यांना या 5 दिवसांच्या शिबिरातून लस उपलब्ध होणार आहे. तर नागरीकांच्या मागणीनुसार येत्या काळात अधिकाधिक शिबिरे आयोजित करून कल्याणातील जास्तीत जास्त नागरीकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार कपिल पाटील म्हणाले.
या शिबिरामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करून पद्धतशीरपणे नागरीकांना आगाऊ वेळ कळवून लसीकरण करण्यात येत आहे. त्याबद्दल नागरीकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा