Home कोरोना बँक कर्मचाऱ्यांनाही ‘फ्रंटलाईन वर्कर्स’मध्ये समावेश करत लसीकरण मोहीमेत प्राधान्य द्या – खा.डॉ....

बँक कर्मचाऱ्यांनाही ‘फ्रंटलाईन वर्कर्स’मध्ये समावेश करत लसीकरण मोहीमेत प्राधान्य द्या – खा.डॉ. श्रीकांत शिंदे

 

नवी दिल्ली 24 मार्च :
कोरोना काळात डॉक्टर्स, वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचारी, पोलिस यंत्रणा, सफाई कामगार यांच्याबरोबरच बँक कर्मचाऱ्यांनाही फ्रंटलाईन वर्कर्स श्रेणीत समावेश करत कोरोना विरोधी लसीकरण मोहीमेत प्राधान्य देण्याची आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. काल लोकसभा अधिवेशनादरम्यान शुन्य प्रहर काळात ते बोलत होते.   (Include bank employees in ‘Frontline Workers’ and give priority to vaccination campaign – Dr. Shrikant Shinde)

देशामध्ये १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँक, २२ खाजगी बँक, ४४ विदेशी बँक, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँक, १४८५ नागरी सहकारी बँक तर ९६००० ग्रामीण सहकारी बँका असून यात १५ लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला होता. रेल्वे तसेच बस सेवांवर प्रतिबंध असतानादेखील कामावर हजर राहून बँक कर्मचाऱ्यांनी अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्याचे तसेच विविध योजनां कार्यान्वित ठेवण्याचे काम केले. या दरम्यान काही कर्मचारी कोरोना बाधित झाले तर काहींचा कोरोनामुळे मृत्यूही झाल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.

या पार्श्वभूमीवर सर्व बँक कर्मचाऱ्यांना फ्रँटलाईन वर्कर्स श्रेणीत घेऊन त्यांना कोरोना लसीकरण मोहिमेत प्राधान्य दिल्यास कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करता येतील, असे मतही डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा