Home ठळक बातम्या रेरा घोटाळ्यात महापालिका अधिकाऱ्यांचीही चौकशी करा – डीपीडीसी बैठकीत मनसे आमदार राजू...

रेरा घोटाळ्यात महापालिका अधिकाऱ्यांचीही चौकशी करा – डीपीडीसी बैठकीत मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

मनसे आमदार राजू पाटील यांची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी

कल्याण ग्रामीण दि.१२ नोव्हेंबर :
बनावट कागपत्रांद्वारे केडीएमसी तसेच रेरा प्राधिकरणाची फसवणूक झालेल्या घोटाळ्यात अधिकाऱ्यांचीही चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी दिले आहे.

उपस्थित लोकप्रतिनिधींकडूनही या मागणीला समर्थन…

रेरा घोटाळ्याचा तपास सध्या एसआयटीमार्फत सुरू असून आतापर्यंत पाच जणांना अटक झाली आहे. मात्र ही बांधकामे काही एका दिवसात झालेली नसून या बांधकामांना भू-मालक आणि बिल्डर जेवढे जबाबदार आहेत तेवढेच अधिकारीदेखील जबाबदार असल्याचे यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनाही दोषी ठरवून त्यांची चौकशी करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीत केली आहे. तर आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गीता जैन,संजय केळकर यांसह उपस्थित आमदार खासदारांनी देखील पाठिंबा दिला.

वारंवार विषय येऊनही कारवाई होत नसल्याने लोकप्रतिनिधी आक्रमक…
वारंवार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनधिकृत बांधकामांचा विषय येऊनही योग्य कारवाई होत नसल्याने आमदार हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्रमक झाले होते. त्यामुळे आता पालकमंत्री याप्रकरणी अधिकाऱ्यांच्या मागे देखील चौकशीचा फेरा लावणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान आमदार राजू पाटील यांच्या या मागणीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आमदार राजू पाटील यांचे कौतूक केले. तर कल्याण डोंबिवलीमधील विकासकामांसाठी एकजुटीने काम करण्याचे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी आमदार पाटील यांना यावेळी दिले.

२७ गावांतील ४९९ सफाई कामगारांना कायम करून घ्या…

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावातील सफाई कामगार हे गावात स्वच्छतेचे काम करत आहेत. मात्र हे काम करणाऱ्या ४९९ कामगारांना तातडीने शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

बदलापूर ते दिवा स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा…

मध्य रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या महापालिकांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे बस्तान आहे. रेल्वे स्थानक परिसरात प्रवाश्यांना रस्त्याने चालणं देखील कठीण झालं आहे. त्यामुळे कारवाई करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची उपलब्धता करून तातडीनं रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यात यावा. आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उपस्थित आमदारांनी देखील सकारत्मक प्रतिसद देत तातडीने कारवाई मागणी करण्यात आली आहे. नुकताच मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे मनपा प्रशासनाला पत्र देत दिव्यातील रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाला मुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र पत्र दिली नंतर तीन तासाच्या कालावधीत पुन्हा फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडलेले दिसून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या आशीर्वादाने फेरीवाले येत असल्याने ज्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या परिसरात फेरीवाले बस्तान मांडत आहेत. त्यांच्यावर देखील तातडीने कारवाई करून प्रवाश्यांना होणाऱ्या जाचातून सुटका करावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

पलावा सिटी मधील राहिवश्यांची “करा” मधून सुटका करा

कोणत्याही प्रकारची केडीएमसीची सुविधा न घेणाऱ्या पलावा सिटी मधील राहिवाश्यांकडून मोठ्या प्रमाणात कर आकारणी महापालिका करत आहे.नागरिकांनी कर देखील भरलेला आहे.यामध्ये महापालिकेवर नागरिकांचे १५ कोटी पेक्षा अधिक पैसे जमा अधिकचे आहेत.त्यामुळे नागरिकांनी १५ कोटी रुपयांच्या अधिकच्या दिलेल्या पैशांची व्याजासहित पैसे मागतील त्यापेक्षा लवकरच निर्णय घ्या अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विषय घेतला.

२७ गावातील अमृत योजनेचे काम कासवगतीने…

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. गावागावात सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तर पाण्यामुळेअनेकांचे जीव देखील गेले आहेत. मात्र या योजनेचे हे काम कासवगतीने सुरू असल्याने त्याचे काम जलदगतीने करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केलीय.या मागणीला तातडीने पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी योग्य प्रतिसाद देत मंत्रालयीन दालनात तातडीने बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा