Home ठळक बातम्या केडीएमसी निवडणूकीत असे असणार महिला आरक्षण आणि सर्वसाधारण प्रभाग

केडीएमसी निवडणूकीत असे असणार महिला आरक्षण आणि सर्वसाधारण प्रभाग

कल्याण – डोंबिवली दि. 31 मे :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या होऊ घातलेल्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिला आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात आज अनुसूचित जाती (SC) 7 जागा, अनुसूचित जमाती(ST) 2 आणि महिलांचा खुला प्रवर्ग (Ladies Open) 58 जागा यासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. (Kalyan Dombivali Municipal Corporation General Election will have women and other reservations)

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 44 प्रभागांमधून 133 उमेदवार या निवडणुकीत उभे राहणार आहेत. ज्यामध्ये 133 पैकी 50 टक्के म्हणजेच 67 जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्या महिला जागांची आरक्षण सोडत आज सर्वांसमक्ष चिठ्ठ्या काढून जाहीर करण्यात आली.

यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त सुधाकर जगताप, सचिव संजय जाधव यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान १ जून ते ६ जून पर्यंत नागरिकांना यासंदर्भात असणाऱ्या हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर हे आरक्षण अंतिम केले जाणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका एकूण नगरसेवक संख्या – 133

प्रभाग संख्या – 44

4 उमेदवारांचे पॅनल – 1

3 उमेदवारांचे पॅनल – 43

अनुसूचित जाती – 13 जागा ( 7 महिला )

अनुसूचित जमाती – 4 जागा ( 2 महिला )

सर्वसाधारण – 116 जागा ( 58 महिला )

महिला आरक्षण – 67

पॅनल क्रमांक आणि नावानुसार असे असणार सर्व प्रभागांचे आरक्षण…

प्रभाग क्रमांक 1- उंबर्डे, कोळीवली, गांधारे, वाडेघर, सापाड
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 2 – वायले नगर, खडकपाडा, बिर्ला कॉलेज
अ – अनुसूचित जाती , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 3 – गोदरेज हिल, बारावे, टावरी पाडा, गौरीपाडा,
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 4 – मिलिंद नगर, घोलप नगर, शहाड
अ – अनुसूचित जाती महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 5 – वडवली, अटाळी, कोळीवाडा, आंबिवली, गावठाण, मोहना
अ – अनुसूचित जमाती , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 6 मांडा पश्चिम, मांडा पूर्व, टिटवाळा गणेश मंदिर-
अ – अनुसूचित जाती महिला , ब – अनुसूचित जमाती महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 7 – बल्याणी, गाळेगाव
अ – अनुसूचित जाती महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 8 – म्हसोबा मैदान, रामदास वाडी, कोकण वसाहत
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 9 – रामबाग, रामबाग खडक, सुभाष चौक, आझाद नगर
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 10 – फ्लॉवर व्हॅली, चिकण घर गावठाण, काळा तलाव
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 11 – बेतूरकर पाडा, ठाणकर पाडा, रमाबाई आंबेडकर नगर
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 12 – आधारवाडी, सिद्धेश्वर आळी, गफुर डोन चौक
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 13- अहिल्याबाई चौक, गोविंदवाडी, रोहिदास वाडा
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 14 – चिखले बाग, मल्हार नगर, बैल बाजार, जोशी बाग,
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 15- अशोक नगर, शिवाजी नगर, आनंदवाडी
अ – अनुसूचित जाती , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 16 – जरीमरी नगर, गणेशवाडी, लक्ष्मी बाग
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 17 – साई नगर शनी मंदिर, भगवान नगर
अ – अनुसूचित जाती महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 18 – खडेगोळवली, चिंचपाडा, नेहरू नगर
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 19 – विजय नगर, आमराई, हनुमान नगर, दुर्गा नगर
अ – अनुसूचित जाती , ब – अनुसूचित जमाती महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 20 – कोळसेवाडी, चिकणी पाडा
अ – अनुसूचित जाती महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 21- शास्त्रीनगर, तिसगाव, संतोष नगर, अमृत पार्क
अ – अनुसूचित जमाती , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 22- लोकग्राम, मंगल राघो नगर
अ – अनुसूचित जाती , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 23 – नेतिवली, कचोरे
अ – अनुसूचित जाती महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 24- आजदे, सागाव, डोंबिवली एमआयडीसी
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 25- खंबाळ पाडा, चोळेगाव इंदिरा नगर
अ – अनुसूचित जाती , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 26 – बावन चाळ, भागशाळा मैदान, विष्णु नगर
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 27 – राजू नगर, गरिबाचा वाडा, प्रसाद सोसायटी
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 28 – महाराष्ट्र नगर, देवीचा पाडा, गावदेवी
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 29 – मोठागाव ठाकुर्ली, आनंद नगर, नवागाव
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 30- ठाकूर वाडी, जुनी डोंबिवली
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 31- कोपर गाव, शास्त्रीनगर, डोंबिवली
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 32 – जयहिंद कॉलनी, गणेश मंदिर
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 33 – रामनगर, म्हात्रे नगर,शिव मार्केट, राजाजी पथ
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 34- स्वा. सावरकर रोड, सारस्वत कॉलनी, पेंडसे नगर
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 35 – पाथर्ली गावठाण, टिळक नगर , गोग्रासवाडी
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 36 – एकता नगर, गांधी नगर, आनंद नगर, अंबिका नगर
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 37 – दत्त नगर, संगीतावाडी, रघुवीर नगर
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 38- आयरे गाव, तुकाराम नगर
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 39 – नांदिवलि तर्फ पंचानंद, भोपर, पी अँड टी कॉलनी, सुनिल नगर, रामचंद्र नगर
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 40– संदप, घारिवली, उसरघर, काटई, निळजे, पलावा सिटी
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 41- निळजे, घेसर, कोळे गाव, हेदुटणे, उंब्रोली, भाल, मानगाव
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 42– गोळवली, सोनार पाडा, दावडी, आडवली, ढोकळी, द्वारली
अ – सर्वसाधारण महिला , ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 43- पिसवली, गोळवली
अ – अनुसूचित जाती महिला , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 44 – नांदिवली तर्फे अंबरनाथ चिंचपाडा, आशेळे, माणेरे, वसार, व्दारली
अ – अनुसूचित जाती , ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण , ड – सर्वसाधारण महिला

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा