Home ठळक बातम्या विधानसभानिहाय आकडे समोर :डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयात कल्याण ग्रामीणचा मोठा वाटा

विधानसभानिहाय आकडे समोर :डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयात कल्याण ग्रामीणचा मोठा वाटा

 

कल्याण दि.5 जून :
सर्वांचेच लक्ष लागलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी विजय झाला. या लोकसभा निवडणुकीची विधानसभानिहाय आकडेवारी आता समोर आली असून डॉ. शिंदे यांच्या विजयामध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा असल्याचे दिसत आहे. (Loksabha elections Kalyan loksabha Dr Shrikant shinde)

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काल संपन्न झाली. त्यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर होणाऱ्या या देशाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. या विजयामध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघाने डॉ. शिंदे यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. तर त्याखालोखाल डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि मग कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक लागत आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळालेली विधानसभानिहाय मतेLNN

    LNN

  • कल्याण ग्रामीण – 1 लाख 51 हजार 702
  • डोंबिवली – 99 हजार 734
  • अंबरनाथ – 93 हजार 670
  • कल्याण पूर्व – 87 हजार 129
  • उल्हासनगर 85 हजार 698
  • मुंब्रा कळवा – 69 हजार 988
  • LNN

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा