Home ठळक बातम्या बुद्धिबळ – कॅरम स्पर्धेने कल्याण क्रीडा महोत्सवाची सांगता

बुद्धिबळ – कॅरम स्पर्धेने कल्याण क्रीडा महोत्सवाची सांगता

कल्याण दि. ३१ जानेवारी :
स्पोर्ट्स केअर फाउंडेशनतर्फे स्व. यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ आयोजित 4 थ्या कल्याण क्रीडा महोत्सवाचा समारोप बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेने समारोप करण्यात आला. गेले दोन महिने प्रत्येक रविवारी कल्याण डोंबिवलीत संपन्न झालेल्या या महोत्सवामध्ये मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड येथील 94 शाळा-क्लब मधील 3 हजार 840 खेळाडू,180 क्रीडा शिक्षक-प्रशिक्षकांनी 39 क्रीडा – कला प्रकारामध्ये सहभाग घेऊन या क्रीडा महोत्सवाला उदंड प्रतिसाद दिला.

समारोपाच्या दिवशी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सेंट थॉमस शाळेने बाजी मारली तर सेंट लॉरेन्स शाळेने उपविजेतेपद पटकावले. ठाण्याच्या अंबर इंटरनॅशनल शाळेच्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली. ही स्पर्धा 8,10,12, 14 आणि 16 या वयोगटात खेळवण्यात आली.
क्रीडा महोत्सवाचे प्रमुख आयोजक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप ओंबासे यांनी या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. क्रीडा महोत्सवाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की क्रीडा वातावरण तयार करण्याबरोबरच छोट्या खेळाडूने जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि छोट्या खेळाडूंनाही स्पर्धेमध्ये वाव मिळावा हा प्रमुख उद्देश ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पुढील वर्षीही यामध्ये नवनवीन बदल करून अनेक खेळाचा समावेश करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी क्रीडा शिक्षक राम निंबाळकर, नरेंद्र वामनोरे, मितेश जैन , बुद्धिबळ प्रशिक्षक अमित भोजने, रुपेश राजगुरू, रमेश कदम, गिरीश वाधवा हे उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा