Home ठळक बातम्या मराठी राजभाषा दिन : कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात दुमदुमला मराठीचा गजर

मराठी राजभाषा दिन : कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात दुमदुमला मराठीचा गजर

 

मराठी राजभाषा दिनानिमित्त बिर्ला महाविद्यालयात सांस्कृतिक सोहळा

कल्याण दि.27 फेब्रुवारी :
आज असणाऱ्या मराठी राजभाषा दिनानिमित्त कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात मराठीचा गजर दुमदुमलेला पाहायला मिळाला. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात अनेकविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. मराठी शब्दकोश, मराठी विश्वकोश, मराठी वाङमय कोष, मराठी सांस्कृतिक कोश आदी ग्रंथ पालखीत ठेऊन कॉलेज आवारात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्याच्या सोबतीला होता ढोल ताशाचा गजर, ज्ञानेश्वर माऊली तुकारामाचा जयघोष करणारे वारकरी, वासुदेव आणि लेझीमच्या तालावर नाचणारे विद्यार्थी. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी या पारंपरिक मराठी वेशभूषेत म्हणजेच नऊ वारी साड्यांमध्ये तर विद्यार्थी झब्बा पायजमा आणि भगवे फेटे घालून सहभागी झालेले पाहायला मिळाले. तर ढोल ताशांच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अत्यंत सुंदर अशा लेझीमच्या प्रत्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तसेच नऊवारी साड्या नेसून विद्यार्थिनींनी फुगडीचा ठेका धरलेलाही यावेळी पाहायला मिळाला.

दरम्यान बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या ग्रंथदिंडीचा प्रारंभ झाला. ज्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, वरिष्ठ उप प्राचार्य स्वप्ना समेळ, मराठी भाषा विभाग प्रमूख डॉ. सिताराम म्हस्के, माजी प्राचार्य देवरे यांच्यासह विविध शिक्षकवर्ग सहभागी झाला होता.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा