Home ठळक बातम्या आता डायबेटिसचे टेंशन नाही: डायबेटिस रिव्हर्ससाठी डॉ. महेश पाटील यांनी दिला महत्वाचा...

आता डायबेटिसचे टेंशन नाही: डायबेटिस रिव्हर्ससाठी डॉ. महेश पाटील यांनी दिला महत्वाचा सल्ला

डोंबिवली दि.9 मार्च :

आहार खूप महत्वाचा घटक आहे आपल्या आयुष्यामध्ये. कारण कोणत्याही आजाराचे मूळ हे चुकीच्या आहारात असते असे आयुर्वेदातही हेच सांगितले आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की आहार समतोल कसा राहील आणि हे शिकवतो आणि आयुष्यभरासाठी ते कसे उपयोगी राहील, याची काळजी घेत असल्याची माहिती सुप्रसिद्ध आहार तज्ञ डॉ. महेश पाटील यांनी एलएनएनला दिली.

भारत डायबेटिसची जागतिक राजधानी…
आता आपण बघतोय की डायबेटिसच्या (Diabetes) केसेस भरपूर वाढत आहेत. भारत जवळपास जगात पहिल्या क्रमांकावर असून जगात डायबेटिसची राजधानी ( (Diabetes Capital) बनल्यात जमा आहे. गेले दोन वर्षे कोवीड काळात लोकांनी अतिशय चमचमीत पदार्थ, वेगळे पदार्थ खाल्ले. त्यातच वर्क फ्रॉम होम (work from home) कल्चरमूळे लोकांची शारीरिक हालचाल अतिशय कमी झाली. त्यावेळी टाईप टू डायबेटिस (diabetes type 2 – मधुमेह) च्या केसेस खूप वाढल्या आहेत. चुकीचा आहार विहार हे यामागचे सर्वात प्रमुख कारण आहे. तर काही रुग्णांमध्ये इन्सुलिन रेझिस्टेंस (insulin resistance) असतो ज्यांना आपण टाईप 2 डायबेटिक नाही म्हणता येत. आपण योग्य आहार सुरू केल्यास ही समस्या आपण निश्चितच सोडवू शकतो असा विश्वासही डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.

डायबेटिस रिव्हर्स होतो का आणि रिव्हर्स झालेला डायबेटिस (Diabetes Reversal) पुन्हा होऊ शकतो का…?
बऱ्याच जणांचा हा गैरसमज असतो की डायबेटिस रिव्हर्स होतच नाही. एखाद्या व्यक्तीला डायबेटिसचे नुकतेच निदान झालेले आहे किंवा निदान होऊन साधारणपणे पाच वर्षे झाली असतील तर अशा रुग्णांचा डायबेटिस नक्कीच रिव्हर्स होऊ शकतो. मात्र तो रिव्हर्स झाल्यानंतर (HB1C) सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपल्या योग्य जीवनशैली आणि योग्य आहारामध्ये सातत्य राखणे खूपच गरजेचे आहे. कारण आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे झालेला हा आजार आहे. त्यामुळे रिव्हर्स झाल्यानंतर पुन्हा चुकीची जीवनशैली अवलंबल्यास डायबेटिस पुन्हा होऊ शकतो. त्यामूळे डॉक्टर किंवा आहाराला दोष देण्यात काही अर्थ नाही. पाच वर्षांपर्यंतचा डायबेटिस मग तो आनुवंशिक असला तरी आपण प्रयत्न करून नियंत्रित किंवा रिव्हर्स करू शकतो असे डॉ. महेश पाटील यांनी सांगितले.

 

डायबेटिस नियंत्रणात आहाराचे काय महत्व आहे…?
डायबेटिस किंवा मधुमेह हा आजार रक्तातील शर्करा वाढल्यामूळे होतो. ही शर्करा बाहेरून येत नाही तर आपण ज्या पदार्थांचे सेवन करतो त्यातूनच ती तयार होत असते. काही पदार्थ तर असे आहेत की जे खाल्ल्यावर तुमच्या रक्तामध्ये शर्कराच तयार होणार. आणि गेले दोन वर्षे कोवीड (covid lockdown) काळात आपण पाहिले की लोकांचा कर्बोदकांचा आहार खूपच वाढला. आणि त्याला आवश्यक असणारी शारीरिक हालचाल कमी झाली. परिणामी अशा कर्बोदकांमुळे लगेच साखर तयार होऊन रक्तात फिरत राहते किंवा तुमच्या शरीराला व्यायाम नसल्यास त्याचे चरबीमध्ये रूपांतर होते. ज्यालाच टाईप 2 डायबेटिस म्हणतात. आनुवंशिक डायबेटिस होण्याचे प्रमाण साधारणपणे 20 टक्के असून नविन डायबेटिस झालेल्यांनी जर जिद्द ठेवली तर आपण नक्कीच तो रिव्हर्स करू शकतो.

डायबेटिस रिव्हर्सलची चतु:सूत्री कोणती…?

आहार (diet), योगा (yoga), तणाव व्यवस्थापन (stress management) आणि ध्यान (meditation) ही डायबेटिस रिव्हर्स करण्याच्या पद्धतीची चतु:सूत्री समजली जाते. केवळ एकाच गोष्टीमुळे डायबेटिस होणे किंवा तो रिव्हर्स करणे शक्य नसून ही चतु:सूत्री अवलंबल्यास नक्कीच आपण डायबेटिस मुक्त जीवन जगू शकतो.

डायबेटिस असणाऱ्यांनी किंवा तो होऊ नये म्हणून काय आहार घ्यावा…?
सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या शरीरात शर्करा (glucose) तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्बोदकांचे नियंत्रित सेवन करणे आवश्यक आहे. नियंत्रित सेवन म्हणजे अजिबात खाणे असा त्याचा अर्थ होत नाही. आहार नियंत्रण म्हणजे सगळे बंद करणे असे होत नाही तर सगळे खा मात्र योग्य त्या प्रमाणात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी आदी धान्य डायबेटिस नियंत्रणात आणण्यासाठी महत्वाचे काम करतात. त्यामुळेच हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी International millets year 2023 म्हणून घोषित केले आहे. आपल्या रोजच्या आहारात यापैकी एक तरी धान्य असले पाहिजे. त्यासोबतच जेवणामध्ये भाज्यांचे प्रकार – कोशिंबिरीचे प्रमाणही वाढवले पाहिजे. तर डायबेटिस नियंत्रणासाठी प्रोटीन खूप महत्वाचे असून प्रोटीनसाठी नॉन व्हेज महत्वाचे आहे. आयसीएमआरनेही (icmr) रोजच्या आहारात 20 टक्के प्रोटीनचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. तर शाकाहारी लोकांना दूध, दही, ताक, कडधान्यातून प्रोटीन्स मिळू शकतात. जी डायबेटिस होण्यापासून आपल्याला लांब ठेवत असल्याचा महत्वपूर्ण सल्ला डॉ. महेश पाटील यांनी यावेळी दिला.

अधिक माहितीसाठी संपर्क :

डॉ. महेश पाटील : न्युट्रीॲक्सिस , शॉप नं. ६, महागंगा सोसायटी, टिळक रोड, डोंबिवली – पूर्व

मोबाईल : 9004600396 / 7045544195

मुलुंड वेस्ट क्लिनिक : डॉ. मँडोस पॉलीक्लिनिक, हॉरीझॉन सम्यक, झव्हर रोड,             पीएनबी बँकेसमोर, मुलुंड – पश्चिम , मुंबई.

मोबाईल : 8433739886

 

www.facebook.com/nutriaxis

https://www.linkedin.com/company/nutriaxisdiabetesreversal/

https://www.linkedin.com/in/diabetes-reversal-coach-dr-mahesh-patil-9316601b4

 

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा