Home ठळक बातम्या पत्रीपूल ते लोढा पलावा दरम्यानच्या रस्त्यावर नो पार्किंगचे आदेश; ट्रॅफिक पोलिसांचा प्रायोगिक...

पत्रीपूल ते लोढा पलावा दरम्यानच्या रस्त्यावर नो पार्किंगचे आदेश; ट्रॅफिक पोलिसांचा प्रायोगिक तत्त्वावर निर्णय

वाहतूक कोंडी न होण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस उपआयुक्तांचा निर्णय


कल्याण दि. 4 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कल्याण शिळ रोडवरील पत्रीपूल (patri pool) ते लोढा पलावा (lodha palava) मार्गावर पुढील 15 दिवस प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. (No parking order on road between Patripool to Lodha Palawa; Decision of traffic police on pilot basis)

वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी निर्णय…
पत्रीपूल ते लोढा पलावा दरम्यान सध्याची वाहतुकीची परिस्थिती आणि वाहन पार्किंगसाठी उपलब्ध जागा इत्यादीचे सर्वेक्षण करून रस्त्याच्या दुतर्फा नो पार्किंग, सम-विषम पार्किंग याप्रमाणे वाहन पार्किंग जागेचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार, या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खालील मार्गावर वाहने लावण्यास मनाई करण्यात आले आहे.

याठिकाणी असणार नो पार्किंग…
कल्याण पूर्वेतील पत्रीपुल ते डोंबिवली पूर्वेतील लोढा पलावा दरम्यान कल्याण शिळ रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला 9 किमी अंतरापर्यंत 24 तासंसाठी प्रायोगिक तत्त्वावर नो-पार्किंगचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच मोती मिठाई चौक ते कावेरी चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूला 1 कि.मीपर्यंतही 24 तास नो-पार्किंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हरकत किंवा सूचना असल्यास लेखी स्वरुपात नोंदवा…
ही अधिसुचना प्रसिध्द झाल्या तारखेपासून 15 दिवस प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येत आहे. यासंदर्भात काही हरकत किंवा सूचना असल्यास त्या लेखी स्वरुपात पोलीस उपआयुक्त, शहर वाहतूक शाखा कार्यालय, तीन हात नाका, एलबीएस मार्ग, ठाणे 400602 येथे पाठवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

हरकत अथवा आक्षेप प्राप्त न झाल्यास…

तर याबाबत कोणाच्या काही हरकत अथवा आक्षेप प्राप्त न झाल्यास ही अधिसुचना पुढील आदेश होईपर्यंत कायम स्वरुपात अंमलात राहील असेही वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड,  रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचेही उपआयुक्त डॉ. राठोड यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा