Home ठळक बातम्या मनसेमध्ये संघटनात्मक बदल ; डोंबिवली शहराध्यक्षपदी राहुल कामत यांची नियुक्ती

मनसेमध्ये संघटनात्मक बदल ; डोंबिवली शहराध्यक्षपदी राहुल कामत यांची नियुक्ती

डोंबिवली दि.25 ऑक्टोबर :
आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनसेनेही आपल्या पक्षात संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांच्या जागी राहूल कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते राहुल कामत यांना या नव्या जबाबदारीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. मनसे आमदार राजू पाटील, ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यावेळी उपस्थित आहेत.

राहूल कामत यांची एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व अशी ओळख असून ते मनसेच्या कल्याण डोंबिवलीतील पहिल्या फळीचे अनुभवी सहकारी आहेत. कल्याण डोंबिवलीतील सामाजिक, राजकीय परिस्थितीची त्यांना चांगली जाण असून या पार्श्वभूमीवर त्यांची ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

पक्ष कार्यात कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही – राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय, धोरणे आपल्याकडून निष्ठेने राबवण्यात यावीत. त्यामध्ये कोणतीही कुचराई किंवा तडजोड स्विकारली जाणार नाही अशा स्पष्ट शब्दांत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कामत यांना या नियुक्तीपत्रामध्ये सूचना केल्या आहेत. तसेच आपल्याकडून किंवा आपल्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही अशा प्रकारचे आपले वर्तन असेल अशी अपेक्षाही त्यात व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान आगामी निवडणुका, कल्याण डोंबिवलीतील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राहुल कामत हे पक्षातील आपल्या या नव्या जबाबदारीला कसा आणि किती न्याय देतील या प्रश्नाचे उत्तर येत्या काळात मिळेल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा