Home ठळक बातम्या दसरा मेळाव्यासाठी राज्याबाहेरील लोकही येण्यास उत्सूक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दसरा मेळाव्यासाठी राज्याबाहेरील लोकही येण्यास उत्सूक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

डोंबिवलीतील रासरंग नवरात्रौत्सव आणि दुर्गाडी किल्ल्याला दिली भेट

डोंबिवली – कल्याण दि.५ ऑक्टोबर :
बीकेसी येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी केवळ राज्यभरातून नव्हे तर राज्याच्या बाहेरूनदेखील लोकं येण्यास उत्सुक आहेत. त्यामूळे मोठ्या प्रमाणात लोकं या दसरा मेळाव्याला येतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या रासरंग नवरात्रौत्सवाला उपस्थिती दर्शवली. त्यांनतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन दुर्गाडी देवीची दर्शन घेतले. (Cm Eknath Shinde)

तीन महिन्यांपूर्वी आम्ही मोठा कार्यक्रम केला…
आता मोठ्या उत्साहात सन साजरे होत आहेत , पांच वर्ष तुम्ही हा रास रंग कार्यक्रम मोठा करताय, आम्ही पण तीन महिन्यापूर्वी कार्यक्रम केला, तो कार्यक्रम मोठा झाला. आता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आयोजित रासरंग हा कार्यक्रमही मोठा होत चालल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या रासरंग या नवरात्रौत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली. आपल्या भाषणाची सुरुवात करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

दोन वर्ष काही झालं नाही यंदा दहीहंडी, गणेशोत्सव, दसरा आणि त्यानंतरची दिवाळी पण जोरात साजरी होणार. राज्यात तुमच्या सर्वसामान्य लोकांचं सरकार आलं आहे. लोकांच्या मनात जे आहे ते देण्याचे आपण पूर्ण प्रयत्न करणार. मी आणि देवेंद्रजीनी सणांवरील निर्बंध काढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वमान्य माणसाच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा आमचा प्रयत्न…
दिवाळी चांगली पाहिजे म्हणून सरकारने रवा ,साखर , डाळ ,तेल फक्त १०० रुपयात केलं. सरकारला अजून १०० दिवसही झाले नाहीत पण आम्ही सगळं १०० रुपयात केलं. हे छोटं काम आहे मोठमोठी कामे करायची आहेत. पुढे राज्याचा विकास वेगाने होईल ,सर्वमान्य माणसाच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील देवीचे दर्शन…
डोंबिवलीतील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील देवीचे दर्शन घेतलं. दुर्गाडी किल्ल्यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आल्याने ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात शिंदे यांचे स्वागत केलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेही पहिल्यांदाच दुर्गाडी किल्ल्यावर आले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात दुर्गाडी उत्सव साजरा होतोय. गेली दोन वर्ष कोव्हिड मुळे बंधनं होती. मात्र यावर्षी सहा ते सात लाख लोकांनी दुर्गाडी देवीचा दर्शन घेतलेय आणि मनोभावे पूजा केली. सर्व दुर्गाडी देवीभक्तांना शुभेच्छा देतो. मी पण दर्शन घेतलेय , नवरात्र उत्सव सगळीकडे श्रद्धापूर्वक मोठ्या उत्साहात साजरा झाला, याचा आनंद होतोय.

बीकेसी येथे होणारा दसरा मेळावा जोरात होणार. राज्यभरातून नव्हे तर राज्याच्या बाहेरूनदेखील लोक येण्यासाठी उत्सुक आहेत आणि सगळे लोक मोठ्या संख्येने त्याठिकाणी उपस्थित राहतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा