Home ठळक बातम्या आगरी सेनेच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रेमनाथ म्हात्रे यांची नियुक्ती

आगरी सेनेच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रेमनाथ म्हात्रे यांची नियुक्ती

 

कल्याण दि.२५ जुलै :
भूमीपुत्र बांधवांची एक प्रमूख संघटना असणाऱ्या आगरी सेनेच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रेमनाथ म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली. येत्या १ ऑगस्ट रोजी असणाऱ्या आगरी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आगरी सेना ठाणे जिल्हास्तरीय आढावा बैठक कल्याण पश्चिमेतील साई हॉलमध्ये नुकतीच संपन्न झाली.

प्रेमनाथ म्हात्रे यांनी युवा आगरी सेनेचे कल्याण शहरप्रमुख तसेच युवा आगरी सेना कल्याण तालुका प्रमुख म्हणून काम केले आहे. समाजाच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असल्याची दखल घेत आगरी सेना नेते प्रदिप साळवी यांनी त्यांची ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी यावेळी नियुक्ती जाहीर केली.

या बैठकीला आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी यांचे सुपुत्र आणि आगरी सेना नेते प्रदिप साळवी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कैलास पाटील,संपर्क प्रमुख मनोज साळवी, नाशिक जिल्हा प्रमुख संपत डावखर, ठाणे जिल्हा प्रमुख चंद्रकांत ठाणकर, सरचिटणीस मंगेश शेलार, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रभुनाथ भोईर, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण अंदाडे, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख संजय फुलोरे,युवा आगरी सेना उपाध्यक्ष गणेश कडु यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सर्व तालुकाप्रमुख, शहरप्रमुख तसेच महिला आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते. या आढावा बैठकीनंतर ठाणे जिल्ह्यातील तालुका, शहर, विभागीय स्तरावर नविन पदाधिकारी नेमणुका करण्यात आल्या.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा